मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon Care Tips: चिप-चिप शिवाय कसा घ्यावा मान्सूनचा आनंद? नको असलेला चिकटपणा दूर ठेवण्यासाठी टिप्स

Monsoon Care Tips: चिप-चिप शिवाय कसा घ्यावा मान्सूनचा आनंद? नको असलेला चिकटपणा दूर ठेवण्यासाठी टिप्स

Jul 03, 2024 11:36 PM IST

Stickiness in Monsoon: मान्सूनचा हंगाम सुरु झाला आहे. परंतु जेव्हा आपली त्वचा चिकट वाटते तेव्हा जास्त आर्द्रता आपला मूड खराब करू शकते. आपण ते कसे दूर ठेवू शकता ते जाणून घ्या.

मान्सूनचा आनंद घेण्यासाठी टिप्स
मान्सूनचा आनंद घेण्यासाठी टिप्स (Pexels )

Tips to Enjoy Monsoon without Chipchip: उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आपली सुटका करून मान्सून दाखल झाल्याने प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. आकाशात दाटलेले ढग आल्हाददायक वातावरण तयार करते. तर आपल्यातील लहान मूल पावसात भिजण्यासाठी तयार असते. पावसाळा म्हटलं की चहा, गरमा गरम भजी, स्नॅक्स आणि बाल्कनीत बसून मारलेल्या गप्पा हे सर्वांनाच आवडते. पण पावसासोबत येणारा आर्द्रता आणणारा ओलसरपणा आणि चिकटपणा नकोसा वाटतो. चिप-चिप निराशाजनक असू शकते. पावसामुळे आर्द्रता वाढते, घामाचे बाष्पीभवन होण्यापासून रोखते आणि आपले कपडे हेवी देखील वाटतात. आर्द्रता हे एक दुःस्वप्न आहे, ज्यामुळे छिद्रे बंद होतात आणि अधिक ब्रेकआऊट होतात. पावसाळ्यात चिपचिप दूर करा आणि चिकटपणापासून मुक्त राहा. कसे ते येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

हलके कपडे घाला

हवेतील ओलावा तुमचे कपडे जड बनवतो कारण ते कपड्यात मुरते. हे आपल्यावर चिकटून राहते, ज्यामुळे आपल्याला आणखी घाम येतो. या दरम्यान आपली त्वचा अधिक तेल देखील तयार करते, ज्यामुळे कपडे नेहमीपेक्षा चिकट वाटतात. डेनिम आणि घट्ट फिटिंग कपडे घालू नका. कॉटन आणि लिनन सारखे पर्याय निवडता. लूज फिट कपडे घाला जे हवेशीर वाटतात.

त्वचेची अतिरिक्त काळजी घ्या

पावसाळ्यातील उच्च आर्द्रतेत त्वचेच्या सेबेशियस ग्रंथी अधिक तेल तयार करतात. कोणतीही कॉमेडोजेनिक प्रोडक्ट टाळा - हे असे घटक आहे जे आपले छिद्र बंद करू शकतात. तुमची त्वचा एक्ने प्रोन असेल, संवेदनशील त्वचेसाठी अनुकूल क्लींजरने आपला चेहरा वारंवार धुवा. ब्रेकआऊट टाळण्यासाठी आपल्या स्किन केअर रूटीन फॉलो करा. हलके, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा जे त्वरीत शोषले जाईल. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि बंद छिद्रे उघडण्यासाठी वारंवार एक्सफोलिएट करा. शॉवर किंवा आंघोळ टाळू नका. कारण पावसाळ्यात घामातील घाण आणि चिकटपणा दूर करण्यासाठी स्वच्छ राहणे आवश्यक आहे. फेस मास्कने तुम्ही स्वत:ला फ्रेश करू शकता.

हायजेनिक राहा

या पावसाळ्यात कोणताही चिट डे नाही. रोज घालण्यासाठी फ्रेश कपडे असण्यासाठी आपल्या लॉन्ड्रीची अतिरिक्त काळजी घ्या. पुन्हा कपडे घातल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते आणि जीवाणूंचे प्रजनन क्षेत्र बनू शकते. ही सवय स्वच्छता राखण्यास मदत करते आणि आपल्याला फ्रेश वाटते.

केस धुवा

आपल्या केसांमध्ये ग्रीस तयार होऊ देऊ नका. चुंबकाप्रमाणे ते धूळ आणि घाण ओढते. ज्यामुळे आपल्या टाळूला खाज सुटते आणि जड वाटते. हे ग्रीस, गोळा केलेल्या धुळीसह, आपल्या हेअरलाइनभोवती, आपल्या चेहऱ्यावर देखील जमा होते. ज्यामुळे ब्रेकआऊटची शक्यता वाढते आणि आपल्याला आपल्या चेहऱ्यावर चिप-चिप जाणवते. विशेषत: पावसाळ्यातील आर्द्रतेत केस धुणे गरजेचे ठरते. टाळू स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू वापरा. स्वच्छ टाळू त्वरित आपला मूड सुधारते. कोरडेपणा टाळण्यासाठी केसांना तेल लावायला विसरू नका.

स्वत:ला हायड्रेट करा

वर्षभर स्वत:ला हायड्रेटेड ठेवा असं म्हणायला हरकत नाही. मात्र पावसाळ्यात अनेकदा पाण्याचे सेवन टाळले जाते. सगळीकडे पाणी पाहिल्यावर आपल्या शरीराची द्रवपदार्थांची गरज नाकारणे हे मानवी मानसशास्त्र आहे. परंतु विशेषत: पावसाळ्यात स्वत:ला हायड्रेट करणे महत्वाचे ठरते. पाणी विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि आपल्या आतड्याचा सर्वात चांगला मित्र आहे. हायड्रेटेड राहिल्यास मान्सून आर्द्रतेचा, उष्णतेचा सामना करून आतून थंड होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel