How to Manage Diabetes in Ramadan 2024: जगभरातील लाखो लोक महिनाभर नमाज व रोजाचे पालन करतात. पण मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा पवित्र सण आव्हानात्मक ठरू शकतो. धार्मिक प्रथांचे पालन करण्यासह आरोग्याची काळजी घेणे आव्हानात्मक ठरू शकते. असे असले तरी इस्लामिक कॅलेंडरच्या या पवित्र महिन्यादरम्यान आरोग्य उत्तम राखणे महत्त्वाचे आहे.
रमझानदरम्यान पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. पण, मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी अन्न-पाण्याचे सेवन न करता असा उपवास केल्याने रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमध्ये चढ-उतार होऊ शकतो. ऊर्जा पातळ्या कायम राखण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी प्रथेनुसार पहाटेपूर्वी भोजन आणि सूर्यास्तानंतर सायंकाळच्या वेळी मेजवानीचा आस्वाद घेतला जातो. पण, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील शर्करेच्या प्रमाणात होणाऱ्या अचानक चढ-उताराला प्रतिबंध करण्यासाठी या आहारासंदर्भात काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. तसेच, मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी संतुलित पौष्टिक आहार नियोजनासह नियमितपणे तपासणी देखील महत्त्वाचे आहे. कन्टिन्युअल ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) सारख्या वेदना-मुक्त डिवाईसेसच्या मदतीने रक्तातील शर्करेच्या रिडिंग्ज अचूकपणे व रिअल-टाइममध्ये घेता येऊ शकतात. रमझानदरम्यान उपवास करणाऱ्यांसाठी संतुलित आहार व नियमित तपासणी आवश्यक आहे, ज्यामधून या पवित्र महिन्यादरम्यान रक्तातील शर्करेच्या पातळ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनाची खात्री मिळेल.
मुंबईतील हिंदुजा व लीलावती हॉस्पिटलचे कन्सल्टण्ट फिजिशयन डॉ. अनिल बलानी म्हणाले, ''नुकतेच करण्यात आलेल्या आयसीएमआर संशोधनानुसार, भारतातील १०१ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह आहे, ज्यामधून प्रभावी सर्वांगीण व्यवस्थापनाचे महत्त्व दिसून येते. रमझानच्या पवित्र उपवासादरम्यान कन्टिन्युअल ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी वरदान आहे. रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर रिअल-टाइम देखरेख ठेवत सीजीएम व्यक्तींना उपवासापूर्वी व उपवासानंतरच्या आहारामुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमध्ये होणाऱ्या कोणत्याही चढ-उतारांना ओळखण्यास आणि त्यांचे व्यवस्थान करण्यास साह्य करते. सीजीएमद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे व्यक्ती आहाराबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. यामुळे त्यांना आहाराचे प्रमाण व वेळ निर्धारित करण्यास, तसेच त्यांच्या गरजांची पूर्तता करू शकतील अशा मधुमेह संबंधित पोषण निवडी करण्यास मदत होऊ शकते. सीजीएम डेटा व आहारसंबंधित निर्णय यांच्यामधील संबंधामुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे प्रभावी व्यवस्थापन व सक्षमीकरणाला चालना मिळते.''
यंदा रमझान साजरा करताना मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे:
नियमितपणे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सीजीएम डिवाईसेस विशिष्ट वेळी रक्तातील शर्करेच्या पातळ्यांना कॅप्चर करण्याऐवजी रिअल-टाइम ग्लुकोज मॉनिटरिंगमध्ये साह्य करतात. हा डेटा सहजपणे स्मार्टफोनवर देखील उपलब्ध होतो, ज्यामुळे आहार, शारीरिक व्यायाम व थेरपीसंदर्भात निर्णय घेणे सोपे होऊ शकते. या डिवाईसेसमधील डेटाचा वापर करत व्यक्ती रमझानदरम्यान आहार नियोजनाबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात आणि आरोग्य उत्तम राखू शकतात.
प्रथेनुसार खजूर व फळांचे सेवन करत उपवास मोडला जातो, ज्यानंतर योग्य संतुलित आहाराचे सेवन केले जाते. भरपूर पाणी पित स्वत:ला हायड्रेट ठेवण्याची खात्री घ्या आणि उच्च कॅफिन असलेले किंवा साखरयुक्त पेये जसे कॉफी, चहा व शीतपेये पिणे टाळा. कर्बोदके, प्रथिने व फॅट्सचे योग्य संतुलन असलेला संतुलित आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. पौष्टिक व पिष्टमय पदार्थ जसे ओट्स, मल्टीग्रेन ब्रेड्स, भाज्या, मसूर (डाळ) आणि प्रथिने जसे मासे, टोफू व नट्स यांचे सेवन करा.
तसेच, तुम्ही इफ्तारदरम्यान (किंवा सेहरीच्या दरम्यान देखील) सायंकाळचे स्नॅक म्हणून मधुमेहाशी संबंधित ओरल न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स सेवन करू शकता. उच्च दर्जाची प्रथिने व महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक असलेल्या अशा वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेले सप्लीमेंट्स मंद गतीने ऊर्जा रीलीज करतात, ज्यामुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्या, भूक व ऊर्जा पातळ्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. पौष्टिक गरजांनुसार योग्य सोल्यूशन्सची निवड करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शारीरिक व्यायाम योग्य मधुमेह पोषणाइतकाच महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. उपवासादरम्यान संतुलित आहाराच्या सेवनासोबत नियमितपणे व्यायाम करत तंदुरूस्त राहणे हा देखील मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याचा उत्तम मार्ग आहे. अतिप्रमाणात व्यायाम करणे टाळा (विशेषत: उपवासाच्या शेवटच्या काही तासांदरम्यान). त्याऐवजी, जवळपास ३० मिनिटांसाठी साधे वर्कआऊट्स करा. यामध्ये चालणे किंवा योगा करणे यांचा समावेश असे शकतो.
रमझानदरम्यान अनेकदा मित्र व कुटुंबियांसोबत रात्री उशिरापर्यंत वेळ व्यतित केला जातो. पण, आरोग्य उत्तम राखण्यासाठी पुरेशी व योग्य प्रमाणात झोप घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे झोप कमी होण्याच्या प्रमाणाला देखील प्रतिबंध होण्यास मदत होते, ज्याचा भूकेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो किंवा मनसोक्तपणे खावेसे वाटू शकते. तसेच रोगप्रतिकारशक्ती, चयापचयाला साह्य करण्यासाठी आणि रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे नियमन करण्यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे.