आजकाल जवळपास सर्वचजण आरोग्याची योग्य ती काळजी घेताना दिसतात. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होता आहे. त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फळे, बीया आणि इतर पौष्टीक पदार्थ खात असतात. उन्हाळ्याच्या काळात चिया सीड्स खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या सीड्स खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया चिया सीड्स खाण्याचे फायदे...
चिया सीड्स खाल्ल्यामुळे पाचक समस्या दूर होतात. तसेच बद्धकोष्ठता, सूज येणे, चिडचिड होणे, आतड्यांसंबधी सिंड्रोम कमी होण्यास मदत होते.
वाचा: गरोदरपणात सीट बेल्ट लावणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या कोणत्या चुका भारी ठरू शकतात
चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. या घटकांमुळे जळजळ कमी होते. तसेच संधिवात, फायब्रोमायल्जिया आणि इतर संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा -3 आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तदाब आणि ट्रायग्लिसेराइड्स कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयरोगाचा धोका कमी होतो.
वाचा: रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्याची चमक वाढवतात ही योगासने, जाणून घ्या कशी करायची?
फायबर आणि प्रथिने जास्त असल्याने हे बियाणे वजन कमी करण्यास आणि त्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात, ज्यामुळे भूक लागत नाही तसेच इतर पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.
चिया सीड्स रक्तातील साखर शोषून घेतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी चिया सीड्स खाणे चांगले ठरते. मधुमेह किंवा प्रीडायबिटीस असलेल्या लोकांनी चिया सीड्स खाण्याचा सल्ला डॉक्टर देताना दिसतात.
वाचा: घरच्याघरी बनवा हा अनोखा टरबूज पिझ्झा! खायला हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा
चिया सीड्स आवश्यक फॅटी अॅसिड, प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. या बिया अत्यंत पौष्टिक असतात. त्यामुळे गरोदरपणात याचा भरपूर फायदा होतो.
चिया सीड्समध्ये प्रीबायोटिक फायबर असतात. हे फायबर आतड्यांमधील जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच निरोगी आतड्याच्या मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतात.
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात चिया सीड्सचा वापर अनेकदा केला जातो. पण चिया सीड्स कशा खायचा असा प्रश्न सर्वांना पडतो. या सीड्स पाण्यात भिजत घाला. त्यानंतर चिकट असा थर तयार होतो. त्यानंतर या बीया कोणत्याही पदार्थावर टाकून खा..
-आपल्या आवडत्या स्मूदी किंवा कोशिंबीरमध्ये या सीड्स टाकल्या जातात
-दही किंवा ओटमीलसाठी टॉपिंग म्हणून सीड्सचा वापर केला जातो
-काही बेकिंग डिशेसमध्ये देखील यांचा वापर केला जाऊ शकतो
संबंधित बातम्या