Traditional Maharashtrian Fashion On Gudi Padwa: गुढीपाडवा जवळ आला आहे. अवघ्या काही दिवसात हा सण साजरा होणार आहे. या दिवसापासून मराठी नववर्ष सुरु होते. या दिवसाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यावेळी महिला आवर्जून पारंपारिक लूक मध्ये तयार होतात. यंदाच्या सणाला तुम्हालाही महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल तर तयारी करायची वेळ आली आहे. सर्वोत्तम साड्या आणि त्याच्या ड्रेपिंग स्टाईलबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. चला तर मग महिलांसाठी काही स्टायलिंग टिप्स जाणून घेऊयात.
साडी निवडताना सण असल्याने व्हायब्रंट रंगांची निवड करावी. उदाहरणार्थ, हिरवे, निळे, गुलाबी आणि नारिंगी उत्सवाचे वातावरण देतात आणि तुमचा लूक अजून छान ब्राईट करतात. डिझायनरपासून साध्यापर्यंत, तुम्ही अशी साडीची स्टाईल निवडू शकता ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.
जर तुम्ही नऊवारी स्टाईलमध्ये सिल्क पैठणी साडी घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पारंपारिक लुक मिळवण्यासाठी ती उत्तम प्रकारे ड्रेप करावी लागेल. यासाठी चला साडी ड्रेपिंग टिप्स जाणून घेऊयात.
> नऊवारी साडी नेसण्यापूर्वी, साडीखाली लेगिंग किंवा सायकलिंग शॉर्ट्स घालावे लागतील.
> यानंतर कंबरेभोवती साडी गुंडाळा आणि पुढच्या बाजूला एक गाठ बनवा, नंतर साडीचा एक भाग पकडून व्यवस्थित प्लीट्स बनवा.
> आता पायांच्या मधोमध प्लेट्स काढून कंबरेच्या मध्यभागी ठेवा.
>आता साडीचा एक लांब टोक धरा आणि त्यावरून प्लीट्स बनवा. लक्षात ठेवा की प्लेट्स डावीकडे आहेत. आता या प्लीट्सचा पल्लू बनवा आणि कंबरेच्या मागून पुढच्या बाजूला आणा आणि पिनने सेट करा.
> तुम्ही साडीवर कंबरपट्टा घालू शकता, यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसाल.
हा लुक पूर्ण करण्यासाठी, तुम्ही नाकात रिंग आणि कानात मोत्याचे झुमके घालावेत आणि मरून रंगाची चंद्राच्या आकाराची टिकली लावायला विसरू नका. केसांच्या स्टाइलसाठी, जुडा महाराष्ट्रीयन लूकसह चांगला दिसतो. तुमच्या बनमध्ये गजरा घालून तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता. याशिवाय कोल्हापुरी चप्पल घालून महाराष्ट्रीयन लूक पूर्ण करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या