Beauty Tips: फळं हे आपल्या आहारासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. याच्या सेवनाने तर अनेक फायदे मिळतात. पण फळांचा वापर तुम्ही स्किन केअरमध्येही (skin care) करू शकतो. पपईही (Papaya Facial)असेच एक फळ आहे. पपई हे असे फळ आहे की जे खाल्ल्याने जेवढे फायदे होतात तेवढेच त्याचे स्किनसाठीही अनेक फायदे आहेत. पपई चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग दूर (remove blackness and tanning from skin) होते. त्वचेवरचा काळेपणाही याने कमी होतो. यामुळे त्वचेवर ग्लो पण येतो. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. याचमुळे वापर करून फेशियल करू शकता. आज आम्ही तुम्हाला पपईने घरच्या घरी फेशियल कसे करायचे ते सांगणार आहोत. पार्लरला जाऊन वेळ घालवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पपई फेशियल करू शकता. यामुळे तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साठी तयार होण्यासाठीही मदत होईल. यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल ते जाणून घेऊयात.
> पपई फेशियल करण्यासाठी तुम्हाला पिकलेली, रसाळ पपई घ्यावी लागेल.
> आता पपईचे मऊ चौकोनी तुकडे मॅश करा आणि त्याची पेस्ट तयार करा.
> फेशियलसाठी तुम्हाला १ वाटी घ्यायची आहे आणि त्यात अर्धा चमचा मध घालायचा आहे.
> त्यात अर्धा चमचा तांदळाचे पीठ आणि अर्धा चमचा साखर घालावे.
> पपईच्या पल्पपासून तयार केलेली १-२ चमचे पेस्ट घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा.
> आता गुलाब पाण्याने चेहरा हलका ओला करा आणि नंतर पपईचे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा.
> तुम्हाला ते चेहऱ्यावर लावावे लागेल आणि हाताने हलके मसाज करावे लागेल.
> पपईची पेस्ट फेशियलप्रमाणे मसाज करून संपूर्ण चेहऱ्यावर छान लावून घ्या.
> सर्व पेस्ट पूर्ण झाल्यावर, १५ मिनिटे चेहरा असेच राहू द्या.
> यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्याला फेशियल प्रमाणे चमक येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)