Meditation Guide: तुम्ही सुद्धा नीट ध्यान करू शकत नाही? जाणून घ्या हा सोपा मार्ग
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Meditation Guide: तुम्ही सुद्धा नीट ध्यान करू शकत नाही? जाणून घ्या हा सोपा मार्ग

Meditation Guide: तुम्ही सुद्धा नीट ध्यान करू शकत नाही? जाणून घ्या हा सोपा मार्ग

Published Aug 02, 2023 11:18 PM IST

Simple Guide For Beginner: आपल्या आयुष्यातील समस्या कमी करणे आपल्या हातात नाही. पण त्यांचा सामना करण्याची कला शिकायला हवी. इच्छा करूनही जर तुम्ही मनाचा ताण कमी करू शकत नसाल तर ध्यान करायला सुरुवात करा.

ध्यान करण्याची सोपी पद्धत
ध्यान करण्याची सोपी पद्धत (pexels)

How To Do Meditation: भविष्याची चिंता किंवा भूतकाळातील आठवणी या दोन गोष्टी आपल्या बहुतेक त्रासांचे कारण आहेत. जर आपण या गोष्टींचा विचार करणे सोडून दिले आणि वर्तमानात जगल्याने आपला ताण बर्‍याच अंशी कमी होईल. ध्यान हेच करते. जेव्हा जेव्हा मानसिक आरोग्याचा विषय येतो तेव्हा ध्यानाचा सल्ला नक्कीच दिला जातो. असे अनेक आजार आहेत ज्यात तणाव घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशा वेळी ध्यान केल्याने अनेक फायदे होतात. ध्यानाचे फायदे जाणून घेतल्यानंतरही अनेकांना ते कसे करावे हे माहीत नसते. येथे जाणून घ्या ध्यान करण्याची सोपी पद्धत.

मेडिटेनशला अवघड बनवू नका

ध्यान कसे करावे याबद्दल तुम्हाला इंटरनेटवर बरेच लेख आणि व्हिडिओ सापडतील. सर्वप्रथम तर हे मोठे अवघड काम किंवा ध्यानाला एक मोठी साधना किंवा तपस्या समजू नका. याचा एक साधी क्रिया म्हणून विचार करा. धावपळीच्या आयुष्यात काही काळ विराम द्यावा असा विचार करा. तुम्हाला शांत व्हायचे आहे आणि मनाला शांत करायचे आहे.

असे करा सुरू

बहुतेक लोक बसून ध्यान करण्याचा सल्ला देतात. दिवसभर वेळ मिळाला नाही तर झोपतानाही सराव करता येतो. बसण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी शांत जागा निवडा. खुर्चीवर किंवा जमिनीवर बसून तुम्ही तुमच्यासाठी जे योग्य असेल ते निवडू शकता. फक्त अशा प्रकारे बसा की तुमची स्थिती काही काळ तशीच राहील. सुरुवातीला तुम्ही फक्त ५ ते १० मिनिटे देऊ शकता.

लक्ष भरकटले तर काळजी करू नका

आता तुम्हाला फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि श्वास सोडता तेव्हा ते आत येत आणि बाहेर जात असल्याचे फील करा. जर तुमचे मन भरकटले किंवा काही विचार आले तर लक्ष श्वासाकडे वळवा. जर तुमचे मन भरकटत असेल तर तुम्ही ते करू शकत नाही असे समजू नका. निराशा वाढवू नका. सुरुवातीला असे असणे अगदी सामान्य आहे. डोळे बंद केले तर फोकस वाढेल. तुमचे डोळे उघडल्यावर तुम्हाला कसे वाटते ते अनुभवा. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा की ध्यानाची सर्वात आव्हानात्मक स्टेप म्हणजे त्यासाठी बसणे. जर तुम्ही हे रूटीन केले तर तुम्ही तुमचे मन अधिक शक्तिशाली बनवू शकाल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner