Beauty Tips: घरच्या घरी करू शकता महागडे गोल्ड फेशियल, फक्त फॉलो करा या ब्युटी टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: घरच्या घरी करू शकता महागडे गोल्ड फेशियल, फक्त फॉलो करा या ब्युटी टिप्स

Beauty Tips: घरच्या घरी करू शकता महागडे गोल्ड फेशियल, फक्त फॉलो करा या ब्युटी टिप्स

Published Jul 04, 2024 01:42 PM IST

Beauty Tips in Marathi: कुठेही जाण्यापूर्वी महिला तासन् तास पार्लरमध्ये वेळ घालवतात. पण तुम्हाला माहित आहे का की घरातील नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही काही मिनिटांत तीच चमक मिळवू शकता. घरी गोल्ड फेशियल करण्यासाठी या ब्युटी टिप्स फॉलो करा.

घरी गोल्ड फेशियल करण्यासाठी ब्युटी टिप्स
घरी गोल्ड फेशियल करण्यासाठी ब्युटी टिप्स (freepik)

Tips to Do Gold Facial at Home: फेशियल करताना चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेला चमकदार आणि स्पॉटलेस बनवून फाइन लाइन्स, डाग आणि रेषांची समस्या दूर होण्यास मदत होते. पण पार्लरमध्ये महागड्या ब्युटी ट्रीटमेंटमुळे जर तुम्ही तुमच्या रुटीन लाइफमध्ये फेशियल करणं टाळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसूनही महागडे गोल्ड फेशियल सहज करू शकता. इतकंच नाही तर या फेशियलचं वैशिष्ट्य म्हणजे ते करण्यासाठी किचनमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांचाच वापर केला जातो. त्यामुळे एलर्जीचा धोका किंवा त्वचेला कोणतीही हानी होत नाही. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी महागडे गोल्ड फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया.

घरी गोल्ड फेशियल करण्याची पद्धत

फेस क्लींजिंग

गोल्ड फेशियलची सुरुवात फेस क्लींजिंगने करावी. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात ४ टेबलस्पून कच्चे दूध घ्या आणि त्यात कापसाचा तुकडा बुडवा. आता ते तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. आता सर्कुलेशन मोशनमध्ये १ मिनिट मसाज करा. यानंतर ओल्या रुमालाने चेहरा पुसून घ्या.

स्टीमिंग

क्लींजिंगनंतर फेशियलची पुढची स्टेप म्हणजे चेहऱ्याला स्टीम देणे. यासाठी शॉवर कॅपने केस झाकून घ्या आणि चेहऱ्याची छिद्रे उघडण्यासाठी २ मिनिटे चेहऱ्याला स्टीम द्या. यानंतर चेहरा आणि मान कापडाने पुसून टाका आणि घाण आणि मृत त्वचा स्वच्छ करा.

फेस स्क्रबिंग

स्टीमिंगनंतर फेस स्क्रबिंग केले जाते. यासाठी एका भांड्यात १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून साखर आणि अर्धा टीस्पून मध घालून सर्व काही चांगले मिक्स करा. आता या तयार स्क्रबने चेहरा २ मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

फेस मसाज

गोल्ड फेशियलची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. फेस मसाज क्रीम बनवण्यासाठी प्रथम २ टेबलस्पून एलोवेरा जेल, १ टेबलस्पून लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घ्या. सर्व एका भांड्यात ठेवा आणि चांगले मिक्स करा. १० मिनिटे या क्रीमने तुमच्या चेहऱ्याला मसाज केल्यानंतर मऊ टिश्यूने चेहरा पुसून टाका.

फेस मास्क

फेशियलची ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. या स्टेपच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील उघडे छिद्र बंद करू शकता. फेस मास्क बनवण्यासाठी एका वाटीत १/४ टीस्पून हळद, २ टेबलस्पून बेसन, २ टेबलस्पून दूध, १ टेबलस्पून गुलाब जल आणि १ चमचा मध घालून सर्व चांगले मिक्स करा. आता ही तयार पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा फेस मास्क बनवताना हे लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा आधीच ऑइली असेल तर मास्क बनवण्यासाठी मधाचा वापर करू नका.

गोल्ड क्रीम

गोल्ड फेशियलची ही शेवटची स्टेप आहे. फेशियलच्या या स्टेपमध्ये तुम्हाला १० मिनिटे चेहऱ्यावर चांगले मॉइश्चरायझर किंवा गोल्ड क्रीम लावावे लागेल. त्यानंतर कॉटन बॉलने चेहरा स्वच्छ करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner