मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dry Cleaning At Home: घरच्या घरीही तुम्ही करू शकता ड्राय क्लीनिंग, ही ट्रिक फॉलो करा!

Dry Cleaning At Home: घरच्या घरीही तुम्ही करू शकता ड्राय क्लीनिंग, ही ट्रिक फॉलो करा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 04, 2024 09:56 PM IST

Natural Alternative to Dry Cleaning: काही कपड्यांना ड्राय क्लीनिंग करावं लागत. पण ते खूप महाग पडतं. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरीही ड्राय क्लीनिंग करू शकता याबद्दल जाणून घेऊयात.

Dry Cleaning Tips
Dry Cleaning Tips (freepik)

Home Remedies: काही कपड्यांना आपण रेगुलर कपडे धुतो त्यापद्धतीने नाही धुवू शकत. एम्ब्रॉयडरी, हेवी वर्क असलेले तसेच महागडे आणि खास कपडे ड्राय क्लीन (homemade dry cleaning solution) करून घेतात. असे बरेच कपडे आहेत जे हाताने धुतले जाऊ शकत नाहीत किंवा अगदी मशीनने धुणे शक्य होत नाही. ड्राय क्लीनिंगसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. विशेषतः हिवाळ्यात जॅकेट आणि लोकरीचे कपडे ड्राय क्लीन करावे लागतात. हा खर्च कमी करायचा असेल, तर बाजारात ड्राय क्लीनिंग करून घेण्याऐवजी तुम्ही घरच्या घरीही ड्राय क्लीनिंग करून घेऊ शकता.होय तुम्ही नीट वाचलंत. तुम्ही घरीच ड्राय क्लिनिंग करू शकता. यामुळे तुमचे कपडे खराब होणार नाहीत. चला जाणून घेऊयात सोपी ट्रिक...

ड्राय क्लीनिंग करण्यापूर्वी, ज्या कपड्यांचा रंग सुटतो ते वेगळे करावे लागतात. कपड्यांच्या लेबलवर ‘ड्राय-क्लीन-ओन्ली’ असे लिहिलेले असेल तर असे कपडे ड्राय क्लीनिंगसाठी आवर्जून घ्या. ज्या कपड्यांमध्ये लेस किंवा जड भरतकाम आहे किंवा फर आणि पंख आहेत, ते फक्त ड्राय क्लीन करून घ्यावेत.

मिठाचं स्क्रब

तुम्ही घरीच ड्राय क्लीनिंग करण्यासाठी सॉल्ट स्क्रब अर्थात मिठाचं स्क्रब वापरू शकता. डाग असलेल्या भागावर मिठाच्या स्क्रबने घासून घ्या. कपड्यांवर बॉडी स्क्रब वापरू नये हे लक्षात ठेवा. आपण स्वयंपाकघरात ठेवलेले मीठ देखील वापरू शकता. डाग काढून टाकल्यानंतर तुम्ही रुमालाच्या मदतीनेही स्क्रब करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सहज घरीच ड्राय क्लिनिंग करू शकता.

होम ड्राय क्लीनिंग किट

तुम्ही घरी ड्राय क्लीनिंगसाठी होम ड्राय क्लीनिंग किट वापरू शकता. हे किट बाजारात सहज उपलब्ध आहे. किटमध्ये दिलेले रासायनिक द्रावण कापडाच्या डागावर लावा आणि किटमध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचनांचे पालन करा. तुमचे कपडे सहज क्लीन होतील.

हे लक्षात घ्या

या पद्धती तुम्हाला बाहेरच्या ड्राय क्लिनिंगप्रमाणेच अनुभव देणार नाहीत. जर कापडे खूप घाणेरडे किंवा खूप महाग असतील तर ते व्यावसायिक क्लिनरनेच स्वच्छ करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel