नेगेटिव्ह लोकांपासून रहा दूर, अन्यथा बिघडेल तुमचं मानसिक आरोग्य; या आहेत १० टिप्स-how to deal with toxic people in your life ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नेगेटिव्ह लोकांपासून रहा दूर, अन्यथा बिघडेल तुमचं मानसिक आरोग्य; या आहेत १० टिप्स

नेगेटिव्ह लोकांपासून रहा दूर, अन्यथा बिघडेल तुमचं मानसिक आरोग्य; या आहेत १० टिप्स

Aug 28, 2024 03:24 PM IST

stay away from toxic people- आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोकं असतात. यातील काही जण आपल्या भावनिक आरोग्यासाठी चांगले नसतात. अशा लोकांना ओळखण्याच्या या काही टिप्स.

नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याच्या टिप्स
नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याच्या टिप्स

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. प्रत्येक माणसाची वागणूक आणि विचारसरणी ही वेगवेगळी असते. यातील काहींचे विचार हे फारच नकारात्मक असतात. अशा प्रवृत्तीचे लोक हे अनेकदा सहज ओळखलेही जातात. परंतु कधीकधी त्यांचं खरं रुप कळण्यास फार उशीर देखील लागू शकतो. जेव्हा त्याचं हे नकारात्मक स्वरुप पुढे येतं तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही त्यांना आयुष्यभर कधीही ओळखू शकत नाही, असंही अनेकदा होतं. असे लोक केवळ नकारात्मक बोलत असतात. यामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवरच शंका येऊ लागते. तुमच्या भावनिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत असतो. असे नकारात्मक विचार करणारे लोक (toxic people) कसे ओळखावे, ते आज जाणून घेऊ या.

प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक बोलतात

काही लोक असे असतात जे प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक बोलत असतात. ते सतत इतरांमध्ये वाईट शोधत असतात. बरेच लोक त्यांच्या बोलण्याला बळी पडतात. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी ते तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या कामात दोष शोधत असतात. अशा लोकांशी मैत्री करणे खूप धोकादायक ठरू शकते. 

इतरांचा करतात हेवा

असे लोक इतरांचा हेवा करतात. कोणाच्याही यशामुळे ते आनंदी होत नाही. हे लोक स्वतःच्या दु:खाने कमी आणि इतरांच्या सुखाने जास्त दुःखी असतात. अनेकदा अशा लोकांना ओळखणे खूप कठीण असते.

इतरांवर अधिराज्य गाजवतात

अशाप्रकारे हेराफेरी करणाऱ्या लोकांशी सामना करणे खूप कठीण असते. ते तुम्हाला त्यांच्या शब्दात असं काही अडकवतात की तिथून बाहेर पडणे खूप कठीण असते. शब्दांचे आमिष दाखवून स्वतःचा फायदा करून घेतात. 

असे लोक आत्ममग्न असतात

असे आत्ममग्न लोक जेव्हा ते संकटात असतील तेव्हाच तुमची आठवण काढतील. असे लोक फक्त स्वतःचा विचार करतात. इतरांना फारसे महत्त्व देत नाहीत. गरज असेल तेव्हाच ते तुमची आठवण काढतात. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे ते तुम्हाला कधीच विचारणार नाहीत.

तुमच्या आजूबाजूला अशा नकारात्मक विचाराच्या व्यक्ती असतील तर खालील टिप्स फॉलो करा

-नकारात्मक लोक (toxic people) बोलता बोलता इतरांना आपल्या शब्दात अडकवतात. याची त्यांना सवय झालेली असते. यानंतर ते तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल विचारून तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांसोबत एका मर्यादेतच बोलावे. अशा लोकांना जास्त वेळ देऊ नये.

-जर एखाद्याचे शब्द तुम्हाला दुःखी करत असतील. त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अशा लोकांपासून हळूहळू दूर होत राहा. या लोकांपासून स्वतःला भावनिकदृष्ट्या अलिप्त करा.

-नकारात्मक लोकांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: ला दोष देऊ नका. तर त्यावर उपाय शोधा. त्यांना तुमचा आनंद हिरावून घेण्यापासून रोखा. तुमच्या सभोवताल असलेल्या नकारात्मक लोकांना ओळखण्याचा प्रयत्न करा.