Hair Fall Remedies: मुलींसाठी त्यांचे केस फार महत्त्वाचे असतात. लांब दाट केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. पण याच्या अनेक समस्याही जाणवतात. अनेकदा सकाळी उठल्यावर केसात फार गुंता झालेला दिसतो. गुंतलेले केस गळण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते. अनेक वेळा, सकाळी उठल्याबरोबर गुंता काढणे खूप कठीण काम आहे. बऱ्याच वेळा चिडचिडेपणामुळे आपण केस इतक्या वेगाने कंघी करू लागतो की केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. खूप वेगाने कंघी केल्याने कधीकधी डोकेदुखी होते. अनेकवेळा सकाळी आपल्याला आरामात बसून केस विचारायला पुरेसा वेळ नसतो. घाईघाईने आपण आपल्या केसांची स्थिती बिघडवतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या केसांची स्थिती सुधारू शकता.
हेअर केअर रुटीनमध्ये तुम्ही लीव्ह-इन कंडिशनरचा समावेश केला पाहिजे. गुंतलेल्या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांना कंडिशनर लावा. हे झोपताना तुमचे केस अडकण्यापासून वाचवतील. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे केस गुळगुळीत आणि चमकदार दिसतील.
रात्री केस मोकळे ठेवून झोपणे ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. यामुळे केस अधिकच गुंततात, या समस्येचा सामना करण्यासाठी रात्री केसांना कंघी केल्यावर एक मोकळी गाठ बनवा. या स्टेप्समुळे तुमचे काम खूप सोपे होईल आणि तुम्ही तुमच्या केसांची चांगली काळजी घेऊ शकाल.
ही खूप छोटी गोष्ट वाटेल पण उशीचे कव्हर बदलून तुम्ही तुमच्या केसांमधील गुंता दूर करू शकता. घरात मोस्टली कॉटनचे उशीचे कव्हर वापरतात, त्याऐवजी तुम्ही सिल्क कापडाचे कव्हर वापरावे. हे झोपताना तुमचे केस खराब होण्यापासून वाचवेल. यामुळे सकाळी केसात गुंताही होत नाही. कापूस किंवा इतर कोणत्याही फॅब्रिकपासून बनवलेल्या उशी कव्हर्समध्ये जास्त घर्षण होते, ज्यामुळे तुमच्या केसांचे नैसर्गिक तेलही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत केस लवकर कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)