मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies on Rashes: बर्फापासून ते क्रीमपर्यंत, जाणून घ्या त्वचेवर पुरळ, रॅशेस उठल्यावर काय लावायचे?

Home Remedies on Rashes: बर्फापासून ते क्रीमपर्यंत, जाणून घ्या त्वचेवर पुरळ, रॅशेस उठल्यावर काय लावायचे?

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 02, 2024 10:00 AM IST

Skin Care: हवामान बदलत असताना अनेकांना त्वचेवर पुरळ उठत आहे तर काहींना रॅशेस येत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

how to cure rashes naturally know home remedies
how to cure rashes naturally know home remedies (Freepik)

How to Cure Rashes: कधी अचानक पाऊस पडत आहे तर कधी अचानक कडक ऊन पडत आहे. यामुळे आजारी तर पडतोच आपण पण यासोबतच अनेकांना त्वेचेही आजार होतात. आजकाल लोकांमध्ये कोरड्या त्वचेची समस्या वाढली आहे. अनेकांना त्वचेवर पुरळ आणि खाज सुटणे अशा समस्या होतात. अनेकांना लाल रॅशेस येतात. कधी कधी या रॅशेसमुळे त्वचा आतून फुटू लागते तर कधी जळजळही जाणवते. अशावेळी काय करावे समजत नाही. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि बाहेरून काहीही घेण्याची गरज नाही. त्वचेवर पुरळ, रॅशेस कमी करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

मलई लावा

त्वचेवर पुरळ किंवा रॅशेस आल्यावर त्यावर तुम्ही त्यावर घरातील फ्रेश मलई लावू शकता. त्यात ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असते आणि त्वचेचा पोत सुधारतो. हे फक्त पुरळ कमी करत नाही तर स्किनचा टोनही सुधारते. त्वचेच्या पुरळांवर ताजी मलई लावावे किंवा ज्या भागांवर पुरळ उठले असेल तेथे ते लावावे. अशा प्रकारे, ही समस्या कमी होऊ शकते.

Winter Skin Care: चेहऱ्यावर दररोज मॉइश्चरायझर लावल्यास काय होते? जाणून घ्या

बर्फ लावा

जर त्वचेवर पुरळ उठले असतील तर तुम्ही बर्फ वापरू शकता. हे खूप लवकर काम करतात आणि पुरळ दूर करतात. याशिवाय त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त ते टॉवेल किंवा रुमालात गुंडाळून चेहऱ्याला लावायचे आहे. तुम्ही शरीराच्या इतर भागांवरही लावू शकता जिथे पुरळ उठते.

Skin Care: घरी नाईट क्रीम कशी बनवायची? जाणून घ्या खास DIY रेसिपी

खोबरेल तेल ठरेल उपयुक्त

त्वचेवर रॅशेस आल्यावर सहज सोपा केला जाणारा उपाय म्हणजे खोबरेल तेल लावणे.८ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असण्याव्यतिरिक्त, खोबरेल तेल देखील मॉइश्चरायझिंग गुणधर्मांनी परिपूर्ण आहे जे त्वचेचे स्वरूप सुधारते आणि तिचा पोत सुधारते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर जिथे पुरळ उठले असेल तिथे खोबरेल तेल लावून मसाज करा.

Bleach: ब्लीच केल्यानंतर जळजळ होते का? हे घरगुती उपाय ठरतील देतील आराम!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग