Eye Makeup Look for New Year Party: नवीन वर्षाची पूर्वसंध्या मित्रांसोबत साजरी करण्यासाठी तुम्ही तयारी केली असेलच. पार्टीसाठी कुठे जायचे, आउटफिट असं ठरलं असेल. पण जर पार्टीमध्ये उठून दिसण्यासाठी तुम्ही मेकअप कसा करावा याबाबत कंफ्यूज असाल तर हे हटके आय मेकअप ट्राय करा. तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल. हा आय मेकअप तुम्हाला परफेक्ट लुक देईल. जाणून घ्या हा मेकअप कसा करावा.
जान्हवी कपूरप्रमाणे आयशॅडोसाठी गोल्डन रंग वापरा. तसेच डोळ्यांना डीप लूक द्या. गोल्डनसोबत ब्राऊन शेड वापरल्यास तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल. पण लक्षात ठेवा की ते तुमच्या कपड्यांशी मॅच झाले पाहिजे.
कियारा अडवाणी सारख्या स्मज वाले सॉफ्ट स्मोकी आय लुक हिवाळ्यात व्हायब्रंट दिसेल. हे तुम्हाला गॉर्जियस लूक देखील देईल. वेस्टर्न वेअरसोबतच तुम्हा हा आय मेकअप एथनिक कपड्यांसोबतही चांगला दिसेल आणि तुम्हाला हॉट लुक देईल.
ग्लिटरच्या मदतीने डोळे हायलाइट करा. ते लावणे खूप सोपे आहे. प्रथम लाइट पिंक किंवा तुमच्या कपड्यांशी मॅच करणाऱ्या रंगाचे आयशॅडो लावा आणि वर ग्लिटर लावा. हे डोळे मोठे दिसण्यास मदत करतात. पण बोल्ड ब्लॅक आय लाइनर लावायला विसरू नका.
जर तुम्हाला चिअरफुल फंकी लूक हवा असेल तर डबल शेडसह ब्राइट कलर आयशॅडो लावू शकता. हे खूप सुंदर दिसेल.
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांचा डार्क काळा रंग आवडत असेल तर तुम्ही क्रिती सेननसारखा स्मोकी लुक ट्राय करू शकता. काळ्या रंगाच्या काजल आणि आयलायनरच्या मदतीने मेकअप करा. हे आकर्षक दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या