Tips To Control Uric Acid Naturally: युरिक ॲसिड हे शरीरात तयार होणारे बायप्रोडक्ट आहे, जे पचनानंतर प्युरीनच्या विघटनाने तयार होते. अनेक वेळा हे प्युरीन शरीरात तयार होते. त्याचे प्रमाण अनेक पदार्थांमध्येही हे आढळते. जेव्हा शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त होते तेव्हा त्यामुळे सांध्यामध्ये गाउट तयार होतो, जे खूप वेदनादायक असते. शरीरातील यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. यांच्या मदतीने गाउट होण्याचा धोका कमी करता येतो. जाणून घ्या या उपयुक्त टिप्स,
युरिक ॲसिड वाढण्याचे कारण म्हणजे काही पदार्थांचे जास्त प्रमाण असते. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. हे कोणते पदार्थ आहेत पाहा
- रेड मीट, ट्राउट आणि ट्यूनासारखे मासे, सीफूड
- शर्करायुक्त पदार्थ आणि पेये
- फुल फॅट मिल्क आणि फुल फॅट डेअरी प्रोडक्ट
- बीअर आणि इतर अल्कोहोलयुक्त ड्रिंक
- हाय प्रोटीन डायट
जर तुम्हाला शरीरातील युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीचे प्रमाण नक्कीच समाविष्ट करा. हे रक्तातील यूरिक ॲसिडचे वाढते प्रमाण कमी करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सीसोबत फॉलिक ॲसिड आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिनरल्सला तुमच्या आहाराचा भाग बनवा. याशिवाय मेडिकल न्यूड टुडेच्या अहवालानुसार हळद देखील सप्लीमेंट म्हणून घेतली जाऊ शकते. हे रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित करते.
योग्य खाण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, निरोगी आणि पोषण समृद्ध डायट फॉलो करणे यामुळे वजन बराच काळ नियंत्रणात राहते. रक्तातील यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
आर्थरायटिस फाउंडेशनच्या मते, पुरेसे पाणी प्यायल्याने रक्तातील अतिरिक्त यूरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या