Parenting Guide: मुलांना जास्त गोड खायला आवडते का? या पद्धतीने आहारातील साखर करा कमी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Guide: मुलांना जास्त गोड खायला आवडते का? या पद्धतीने आहारातील साखर करा कमी

Parenting Guide: मुलांना जास्त गोड खायला आवडते का? या पद्धतीने आहारातील साखर करा कमी

Jan 15, 2024 11:11 PM IST

Kid's Health Tips: बहुतांश मुलांना गोड खायला आवडते. अनेक मुल प्रत्येक पदार्थात साखर टाकून खातात. तुमच्या मुलांच्या आहारातील शुगर कमी करण्यासाठी या टिप्स उपयोगी पडतील.

पॅरेंटिंग टिप्स
पॅरेंटिंग टिप्स (pexels)

Ways to Control Kid's Sugar Intake: अनेक मुलांना कोणताही पदार्थ असला तरी त्यात गोड किंवा साखर टाकून खायला आवडते. शिवाय बहुतांश मुलांना गोड पदार्थ खायला आवडतात. गोड पदार्थ खायला चांगले वाटत असले तरी त्याच्या अतिसेवनाने दात तर खराब होतातच पण मुलांचे वजन वाढू शकते. जर तुमच्या मुलाला सुद्धा खूप गोड खायला आवडत असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही या समस्येपासून लवकरच सुटका मिळवू शकता.

क्रिएटिव्हिटी

मुलांची भूक आणि खाण्याची इच्छा वाढवण्यात आपण जेवण कसे सर्व्ह करतो याचाही मोठा हात असतो. चॉकलेट सिरप किंवा कँडी वापरून तुम्ही लहान मुलांचे जेवण चविष्ट आणि आकर्षक बनवू शकता. तर भाज्याही विविध आकारात कापून आकर्षक बनवू शकता. याशिवाय जेवणाला आकर्षक बनवण्यासाठी आणि त्याची चव वाढवण्यासाठी वाटाणा, गाजर, पालक इत्यादी रंगीबेरंगी भाज्या एकत्र शिजवा.

शुगर ड्रिंक

कार्बोनेटेड सोडा, एनर्जी ड्रिंक्स, फ्लेवर्ड वॉटर आणि स्क्वॅशमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तुमच्या मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवा. त्यांना फ्रेश ज्युस प्यायला द्या. पण लक्षात ठेवा फ्रेश ज्यूसमध्ये साखर घालू नका.

गोडला आवश्यक बनवू नका

अनेकदा अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर डेझर्ट किंवा एखादा गोड पदार्थ आवर्जुन खाल्ले जाते. मुलाला या गोड व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी घरात असे नियम करू नका. असे केल्याने काही काळानंतर मुल हळूहळू गोड खाणार नाही.

स्तुती करण्याचा नवीन मार्ग

असे दिसून येते की जेव्हा मुलं चांगले काम करतात तेव्हा पालक मुलाला चॉकलेट किंवा कॅडबरी बक्षीस म्हणून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची स्तुती करण्याच्या या पद्धतीचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांना बक्षीस म्हणून पेन्सिल किंवा फळ द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner