Moja cleaning hacks: शाळेत जाणारी मुलं असोत किंवा मग ऑफिसला जाणारे मोठे, सगळेच शूजच्या आतून मोजे घालतात. अनेक ठिकाणी पांढऱ्या रंगाचे मोजे घातले जातात. या मोज्यांवर लवकर घाण चढते. याला कसं स्वच्छ करावं याबद्दल समजत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे घाण झालेले पांढरे मोजे सहज स्वच्छ करू शकता. यामुळे तुमचे मोजे पुन्हा नव्यासारखे दिसू शकतात. यासाठी तुम्हाला अतिरिक्त सामान आणायची गरज नाही. तुम्ही घरातील काही साहित्याने मोजे स्वच्छ होतील. चला जाणून घेऊयात मोजे कसे स्वच्छ करावेत.
> पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि या मिश्रणात पांढरे मोजे टाका. हे मोजे २ तास तसेच राहुद्यात. २ तासांनंतर, गरम पाण्याच्या मदतीने मोजे स्वच्छ करा. मोजे पुन्हा नव्यासारखे दिसतील.
> पांढरे मोजे स्वच्छ करण्यासाठी सामान्य डिटर्जंट वापरू नका. त्यापेक्षा मोजे धुण्यासाठी चांगल्या दर्जाचे डिटर्जंट वापरा.
> गरम पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि या मिश्रणात मोजे टाकून ठेवा. थोड्याच वेळात, सॉक्सवरील डाग दूर होतील आणि तुमचे मोजे पूर्णपणे स्वच्छ होतील.
जर तुम्हाला असे वाटत असेल की मोजे जास्त घाण होऊ नयेत, तर तुम्ही दोन दिवसांपेक्षा तेच मोजे घालू नकात. प्रत्येक पर्यायीएक दिवस सोडून मोजे स्वच्छ केल्याने ते जास्त घाण होणार नाहीत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)