Tips for Cleaning Washing Machine: लोकांची कपडे धुण्यासाठी फार वेळ आणि मेहनत जायची. आता याची जबाबदारी वॉशिंग मशीनवर आली आहे. वॉशिंग मशिनमुळे लोकांचे काम खूप सोपे झाले आहे. वॉशिंग मशिनमध्ये कपडे झटपट धुतले जातात. मोठे मोठे कपडे सहज धुतले जातात. पण आपले घाणेरडे कपडे धुणाऱ्या या मशिनलाही साफसफाईची गरज आहे. वाशिंग मशीन अगदी रोज वापरली जाते. सततच्या वापरामुळे मशिनमध्ये पाणी आणि साबण जमा होते. ही घाण वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही वॉशिंग मशिन स्वच्छ न केल्यास ती लवकर खराब होऊ शकते. मशीन साफ करण्याचे काही सोपे उपाय जाणून घ्या.
> व्हिनेगर आणि बेकिंग सोडा: वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी प्रथम त्याच्या ड्रममध्ये २ कप व्हिनेगर घाला. आता उच्च तापमानावर मशीन चालवा. त्यानंतर अर्धा कप बेकिंग सोडा घालून परत एकदा ढवळावे. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा सहजपणे घाण आणि बॅक्टेरिया काढून टाकतात.
> लिंबाचा रस : लिंबाचा रसही वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सर्व प्रथम, दोन लिंबू पिळून त्यांचा रस काढा आणि हा रस वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये घाला. आता ड्रमरला एकदा सुती कापडाने स्वच्छ करा. लिंबाचे आम्लीय पॉवर घाण काढून टाकते आणि ताजेपणा देते.
> जुना टूथब्रश आणि टूथपेस्ट: मशिनचे डिटर्जंट ट्रे किंवा गॅस्केटसारखे घाणेरडे भाग स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथपेस्टमध्ये टूथब्रश बुडवा.
>ड्रायर शीट: जर तुमच्या मशीनला वास येत असेल तर ड्रममध्ये ड्रायर शीट ठेवून सायकल चालवल्यास मदत होऊ शकते.
> मशीन नेहमी आतूनच नव्हे तर बाहेरूनही स्वच्छ करा. शक्य असल्यास, मशीनला वरून कापड किंवा प्लास्टिकने झाकून ठेवा जेणेकरून त्यावर धूळ किंवा माती साचणार नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)