मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Toilet Cleaning Tips: या स्वस्त गोष्टीने टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे करा स्वच्छ! फॉलो करा टिप्स

Toilet Cleaning Tips: या स्वस्त गोष्टीने टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे करा स्वच्छ! फॉलो करा टिप्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 09, 2024 05:48 PM IST

How to clean jet spray: अनेकदा वेस्टर्न टॉयलेट हॅन्ड जेट शॉवर स्प्रे कसं साफ करायचं समजत नाही. यासाठीच आम्ही काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.

 toilet hand jet shower spray cleaning
toilet hand jet shower spray cleaning (Freepik)

Bathroom Cleaning Tips: आजकाल अनेकांच्या घरात वेस्टर्न टॉयलेट असतात. वेस्टर्न टॉयलेटसाठी जेट शॉवर स्प्रे वापरला जातो. काही वेळा नंतर हे स्प्रे अनेक वेळा ब्लॉक होते. हे गंजमुळे असू शकते किंवा अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. यामुळे स्प्रेमधून पाणी नीट येत नाही अडकून राहते. हे साफ करण्यासाठी तुम्हाला प्लंबरला बोलवावे लागते. ज्यासाठी तो चांगले पैसेही घेतो. पण आता तुम्हाला हे करण्याची गरज नाही कारण येथे आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः जेट स्प्रे स्वच्छ करू शकता.

हॅन्ड जेट शॉवर स्प्रे कसे स्वच्छ करावे?

> हॅन्ड जेट शॉवर स्प्रे करण्यासाठी तुम्हाला पॉलिथिन, व्हिनेगर, बेकिंग पावडर, रबर बँड, डिश वॉशिंग लिक्विड आवश्यक आहे.

> पॉलिथिनमध्ये पांढरा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा. आता जेट शॉवर स्प्रे त्यात २० ते २५ मिनिटे बुडवून ठेवा. आता गरज वाटल्यास त्यात थोडे पाणी घालावे.

> यामुळे ब्लॉक जेट शॉवर स्प्रे उघडेल. आता पाणी तपासा आणि फोर्स चांगला झाला आहे का ते पहा.

> तुम्ही ब्रशच्या मदतीने जेड शॉवर स्प्रे देखील स्वच्छ करू शकता. ही पद्धत देखील प्रभावी आहे.

> तुम्ही बेकिंग पावडर, डिशवॉशिंग लिक्विड आणि व्हाईट व्हिनेगर मिक्स करूनही जेड साफ करू शकता.फक्त या तीन गोष्टी एका बाउल मिक्स करा आणि काही वेळ जेट शॉवर स्प्रे राहू द्या. हा उपायही प्रभाव ठरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel