Mirror Cleaning Tricks: बाथरूममधील आरसा अनेकदा खूप घाणेरडा होतो. या काचेवर पडणारे पाण्याचे ठिपके गोठतात. अनेकदा हे डाग सहज साफ होत नाहीत. मात्र आरसा कोणताही असेल, पण त्यात चेहरा धुसर दिसत असेल तर याला अर्थ त्याला डीप क्लीनिंगची गरज आहे. आरसे स्वच्छ नसतील तर ते दिसायला सुद्धा खराब दिसतात. त्यामुळे त्यांना नियमित स्वच्छ करणे गरजेचे असते. जर घरातील आरसे धुसर झाल्या असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी एक अतिशय भन्नाट ट्रिक आहे.
वॉटर स्प्रे किंवा ओल्या कापडाने ग्लास साफ करण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने काच एकदा साफ होते, पण लवकरच त्यावरील रंग निघू लागतो आणि काळे डाग पडतात. आरसा स्वच्छ करण्यासाठी या दोन ट्रिक्स फॉलो करा
आरसा स्वच्छ करण्यासाठी ही एक अतिशय आश्चर्यकारक ट्रिक आहे. ज्याबद्दल अनेकदा कोणी सांगत नाही. कुठल्याही प्रकारचे कापड घेण्यापेक्षा हातात मोठा जाड कागदाचा तुकडा घ्या. पेपर नसेल तर वर्तमानपत्रही चालेल. फक्त कोरड्या कापडाने काचेवरील धुळीचा हलका थर काढून टाका. नंतर कागदावर दोन ते तीन थेंब पाणी लावा. कागद जास्त ओला करू नका. आता हातात घट्ट धरून संपूर्ण ग्लास स्वच्छ करा. या ट्रिकने कोणत्याही केमिकल शिवाय आरसा लवकर साफ होईल.
बाथरूमच्या काचेवर पाणी आणि साबणाचे डाग असतात. किंवा आरसा खूप घाणेरडा दिसतो. त्यामुळे या घरगुती थिनरच्या साहाय्याने आरसा स्वच्छ करता येते. घरगुती थिनर बनविण्यासाठी, स्प्रे बॉटलमध्ये एक कप पाणी आणि एक कप व्हाईट व्हिनेगर घाला. चांगले मिक्स करा. फक्त हे मिश्रण काचेवर स्प्रे करा आणि मऊ टॉवेल किंवा सुती कापडाने पुसून टाका. आरसा एकदम चमकू लागेल आणि लवकर खराब होणार नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)