मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Hacks: चांदीचे दागिने काळे झाले आहेत? या ट्रिक्सने होईल साफ!

Cleaning Hacks: चांदीचे दागिने काळे झाले आहेत? या ट्रिक्सने होईल साफ!

Feb 03, 2024 04:40 PM IST

How To Clean Silver At Home: आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही चांदीचे दागिने सहज स्वच्छ करू शकता.

Silver jewelry cleaning tips
Silver jewelry cleaning tips (freepik)

Silver Jewelry: दागिने म्हणजे महिलांचा जीव की प्राण. काही दागिने असे आहेत जे विवाहित महिला रोज घालतात. यामध्ये मंगळसूत्र, सोन्याची अंगठी आणि चांदीचे पैंजण आणि पायाच्या जोडवी याचा समावेश असतो. रोजच्या वापरामुळे हे सर्व दागिने घाण व काळे पडतात. या दागिन्यांना वेळोवेळी स्वच्छ करावे लागते. यावर उपाय म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही कमी वेळेत चांदीचे दागिने सहज स्वच्छ करू शकता. चला जाणून घेऊयात महत्त्वाच्या टिप्स...

ट्रेंडिंग न्यूज

चांदीचे दागिने कसे स्वच्छ करावे? (How To Clean Silver At Home) 

> चहाच्या पानांनी चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका लहान भांड्यात एक कप पाणी घाला, आता हे पाणी असलेले भांडे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात अर्धा चमचा चहाची पाने घालून २ मिनिटे उकळू द्या. यानंतर भांड्यात अर्धा चमचा वॉशिंग पावडर घाला आणि उकळी येईपर्यंत थांबा. यानंतर, चांदीची जोडवी, पैंजण आणि अंगठ्या या मिश्रणात घाला आणि २ मिनिटे उकळू द्या. यानंतर, दागिने बाहेर काढा आणि ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.

> याशिवाय पाण्यात लिंबू आणि मीठ मिसळूनही तुम्ही चांदीची भांडी आणि दागिने स्वच्छ करू शकता. ही पेस्ट भांडी आणि दागिन्यांवर टाका आणि स्क्रबने स्वच्छ करा.

> याशिवाय दागिने आणि भांडी स्वच्छ करण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे टोमॅटो सॉस. यामुळे तुमची चांदीची अँकलेट्सही चमकतील. याशिवाय तुम्ही टूथपेस्टही वापरू शकता.

> त्याच वेळी, तुम्ही चांदीची भांडी आणि दागिने सॅनिटायझरमध्ये भिजवून ठेवू शकता, यामुळे त्यांची गमावलेली चमक देखील परत येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग