स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी आणि मॉर्डन भांडी असतात. पण अनेकदा कडधान्य, मसाले, खाण्याचे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी डब्बे वापरले जातात. हे डब्बे बऱ्याचदा स्टील, अॅल्युमिनियमन किंवा प्लास्टिकचे असतात. स्वयंपाक करत असताना त्याला कधी पिठाचे हात लागतात तर कधी वाफेचे शिंतोडे उडताना दिसतात. चिकट आणि तेलकट झालेले हे डब्बे स्वच्छ करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आता हे डब्बे १० मिनिटात कसे स्वच्छ करायचे हे जाणून घ्या...
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून महिला या स्वयंपाक घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. स्वच्छता करताना घरातील चिकट आणि तेलकट हात लागलेले डब्बे कसे स्वच्छ करायचे असा प्रश्न महिलांना पडतो. जर तुम्हाला १० मिनिटात हे डब्बे स्वच्छ आणि चकचकीत करायचे असतील तर घरच्या घरी काय करता येईल याचा विचार करा. त्यासाठी अगदी सोप्या आणि खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर
तुम्ही एका ग्लासात पाणी घ्या. ते पाणी गरम करा. गरम झालेल्या पाण्यात थोडे मिठ घाला. एक कपडा किंवा फडके या पाण्यात बुडवा. त्यानंतर हे फडके खराब झालेल्या डब्ब्याच्या जागेवर फिरवा. असे केल्याने डब्ब्याचा चिकटपणा कमी होतो. तुम्हाला ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा करावी लागेल. त्यानंतर डब्बे एकदम स्वच्छ निघतील.
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी
प्रत्येकाच्या घरात बेकिंग सोडा हा असतोच. हा बेकिंग सोडा डब्ब्यावर बसलेला चिकटपणा घालवून चांगली चमक आणते. एका छोट्या वाटीत पाणी घ्या. या वाटीत एक किंवा दोन चमचे बेकिंग सोडा टाका. कापूस किंवा ब्रशच्या मदतीने हे पाणी लावून डब्बे घासा. १५ ते २० मिनिटे हे पाणी डब्ब्यांवर तसेच राहुद्या. त्यानंतर कोमट पाण्याने हे डब्बे धुवा. डब्ब्यांवरील चिकटपणा कमी होऊन ते चकचकीत दिसू लागतील.
भांडी घासण्याच्या साबणाने चिकट आणि तेलाचे थर बसलेले डब्बे कितीही जोर काढून घासले तरी निघत नाहीत. त्यामुळे एका बादलीत गरम पाणी करुन घ्या. या पाण्यात भांडी घालायचे लिक्विड टाका आणि फेस येई पर्यंत ते एकत्र करा. या लिक्विडने तुम्ही चिकट डब्बे घासू शकता.
वाचा: क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
पाण्यात अॅस्पिरिनची गोळी टाकून देखील डब्बे स्वच्छ आणि चमकदार निघतात. सगळ्यांच्यात घरात या गोळ्या उपलब्ध असतात असे नाही. जर तुमच्या घराती डब्बे जास्तच खराब झाले असतील तर अॅस्पिरिनची गोळी गरम पाण्यात टाका आणि या पाण्याने डब्बे घासा. किंवा या पाण्यात डब्बे बुडवून ठेवलेत तरी चकचकीत होतात.
करोना काळानंतर प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझरटा स्प्रे हा असतोच असतो. तुमच्या खराब झालेल्या डब्ब्यावर हा स्प्रे मारा आणि नंतर घासणीने तेवढा भाग घासा. डब्ब्यावरील चिकटपणा पटकन गायब होतो. असे केल्याने डब्बे चकचकीत दिसतात.
संबंधित बातम्या