Cleaning Hacks: ट्यूबलाइटची घाण साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, काही मिनिटांत होईल नवीनसारखी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Hacks: ट्यूबलाइटची घाण साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, काही मिनिटांत होईल नवीनसारखी

Cleaning Hacks: ट्यूबलाइटची घाण साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, काही मिनिटांत होईल नवीनसारखी

Published Jul 19, 2024 11:09 PM IST

Cleaning Tips: घराला उजेड देणारी ट्यूबलाईट थोडीही घाण झाली तर त्याचा प्रकाश कमी होतो. यामुळे घरात नेहमी अंधार असतो. अशावेळी ते स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

ट्यूबलाइट साफ करण्यासाठी टिप्स
ट्यूबलाइट साफ करण्यासाठी टिप्स

Tube Light Cleaning Tips: घरातील ट्यूबलाईटपासून सगळीकडे उजेड असतो. पण घरातील ट्युबलाईट घाणेरडे किंवा खराब झाले तर ते घराचे सौंदर्य तर बिघडवतातच, तसेच प्रकाशही कमी होतो. काही लोकांची घरं नेहमीच चकचकीत असतात, पण भिंतींवरील ट्यूबलाईट नेहमीच काळी दिसते. हे दररोज साफ करणे कठीण असू शकते. ज्यामुळे त्यांच्यावर धूळ आणि माती जमा होऊ लागते आणि नंतर डाग पडू लागतात. हे डाग साफ करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. येथे आम्ही काही सोप्या टिप्स सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही चुटकीसरशी ट्यूबलाईट साफ करू शकता आणि काही मिनिटांत ते नवीनसारखे दिसेल.

प्रथम कोरड्या कापडाने साफ करा

ट्यूबलाइट स्वच्छ करणे थोडे अवघड आहे. त्याचबरोबर त्याची स्वच्छता करताना काळजी घेणं गरजेचं आहे. ते स्वच्छ करण्यासाठी प्रथम स्विच बंद करा आणि नंतर बोर्डातून ट्यूब लाईट काढून टाका. जर ते चिकटले असेल तर काळजीपूर्वक काढा. त्यानंतर ट्यूबलाईटमधील धूळ आणि घाण साफ करण्यासाठी कोरड्या कापडाचा वापर करा. लक्षात ठेवा की बोर्डावरील ट्यूबलाईट थेट कोणत्याही प्रकारच्या लिक्विडने स्वच्छ करू नका.

व्हिनेगरने चमकेल ट्यूबलाइट

बेकिंग सोड्याव्यतिरिक्त तुम्ही व्हिनेगरच्या मदतीने देखील ट्यूबलाईट साफ करू शकता. याचा वापर केल्याने डाग लगेच दूर होतील. ते स्वच्छ करण्यासाठी प्रथम एक ते दोन कप पाण्यात दोन चमचे व्हिनेगर मिसळून द्रावण तयार करा. आता हे साफ करण्यासाठी प्रथम द्रावणात एक कापड चांगले बुडवून नंतर पिळून घ्या. आता या कापडाने ट्यूबलाईट स्वच्छ करा. नंतर स्वच्छ कापडाने नीट पुसून वाळू द्या. चांगले कोरडे झाल्यावर पुन्हा बोर्डवर लावू शकता.

बेकिंग सोडा करेल मदत

साफसफाईचे काम करण्यासाठी नेहमी बेकिंग सोडा वापरला जातो. ट्यूब लाईट स्वच्छ करण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाकून मिश्रण तयार करा. नंतर हे द्रावणमध्ये ब्रश बुडवून नंतर त्याने ट्यूबलाईट स्वच्छ करा. द्रावणाने स्वच्छ केल्यानंतर ते कोरडे झाल्यावर पुन्हा बोर्डवर लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner