Kitchen Tips: किचन सिंक वारंवार ब्लॉक होत असेल तर जाणून घ्या कसे साफ करावे, वाचा सोप्या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: किचन सिंक वारंवार ब्लॉक होत असेल तर जाणून घ्या कसे साफ करावे, वाचा सोप्या टिप्स

Kitchen Tips: किचन सिंक वारंवार ब्लॉक होत असेल तर जाणून घ्या कसे साफ करावे, वाचा सोप्या टिप्स

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 16, 2024 04:01 PM IST

Kitchen Tips: स्वयंपाकघरातील सिंक ब्लॉक होणे ही सामान्य समस्या आहे. जर तुमच्या किचनमध्येही सतत सिंक ब्लॉक होत असेल तर तुम्ही खाली दिलेले उपाय करायला हवेत. वाचा सोप्या टीप्स..

किचन सिंक
किचन सिंक (Shutterstock)

Kitchen Tips: स्वयंपाकघरातील सिंक ब्लॉक झाल्याची तक्रार ही समान्य आहे. अनेकदा भांडी साफ केल्यानंतर अन्न अडकल्याने किंवा बराच वेळ वापरल्यानंतर सिंक पाईपमध्ये घाण जमा झाल्याने ते ब्लॉक होते. त्यामुळे त्यातून पाणी जाण्याऐवजी बाहेर पडू लागते. जर तुमचे किचन सिंक देखील वारंवार ब्लॉक होत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे मार्ग घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सिंक ब्लॉकिंगच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. शिवाय तुमचे किचन सिंक चमकदार आणि दुर्गंधीमुक्त देखील बनवू शकते.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने होणारी आम्लीय प्रतिक्रिया जमा झालेली घाण काढण्यास मदत करत किचनचे सिंक ब्लॉक झाले असेल आणि त्यात कचरा साचला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून सिंकच्या छिद्रात टाकून द्या. थोड्याच वेळात पाईपच्या आत साचलेला कचरा निघून जाण्यास मदत होते. साधारण १० मिनिटांनी सिंकमध्ये पाणी टाका. त्यामुळे वितळलेला कचरा बाहेर पडण्यास मदत होईल.

वायरचा वापर करा

विविध प्रकारची साफसफाईची उत्पादने टाकूनही कधीकधी सिंक साफ होत नाही आणि पायपामध्ये अडकलेली घाण निघतही नाही. अशावेळी सिंक पाइपमध्ये साचलेली घाण साफ करण्यासाठी तुम्ही वायरचाही वापर करू शकता. यासाठी कडक धातूची तार घ्या, आता ती सिंकच्या छिद्रातून पाईपमध्ये टाका. आता वायर वर-खाली हलवून पाईपमध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने पाईपमध्ये साचलेला कचरा बाहेर पडेल आणि सिंकमधून पाणी व्यवस्थित बाहेर पडू लागेल.

लिंबू आणि इनोने स्वच्छ करा

स्वयंपाकघरातील सिंकचा कचरा साफ करण्यासाठी आपण लिंबू आणि इनो देखील वापरू शकता. इनो आम्लासारखे देखील कार्य करते आणि जेव्हा ते लिंबात मिसळले जाते तेव्हा अम्लीय प्रतिक्रिया होते, ज्यामुळे घाण आणि ग्रीस साफ होते. लिंबू आणि इनो यांच्या मिश्रणाने सिंक स्वच्छ केल्याने पाईपमध्ये साचलेली घाण तर साफ होतेच, शिवाय सिंकमध्ये अडकलेली घाणही स्वच्छ होते. ज्यामुळे सिंक नवीन आणि चमकदार दिसतो. इनो आणि लिंबूपासून सिंक साफ करण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये इनो पावडर घाला. त्यावरून लिंबाचा रस पिळून घ्या. आता हे मिश्रण सिंकमध्ये टाकून स्क्रबरच्या साहाय्याने चोळून स्वच्छ करा. यामुळे सिंक पूर्णपणे साफ होईल.
वाचा: पावसासाठी छत्री खरेदी करताना 'या' ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

मीठ आणि लिंबाचा वापर

अनेकदा सिंकमध्ये अन्न अडकल्याने विचित्र वास येऊ लागतो. मीठ आणि लिंबाच्या साहाय्याने सिंकचा हा वास दूर करता येतो. यासोबतच सिंकमधून पाणी बाहेर जाताना थोडासा अडथळा येत असेल तर तोही दूर करता येतो. यासाठी मीठात लिंबाचा रस मिसळून सिंकमध्ये टाकून रात्रभर सोडावा. त्यात थोडा सा बेकिंग सोडाही घालू शकता. हे मिश्रण रात्रभर सिंकमध्ये टाकल्यानंतर सकाळी पाण्याने स्वच्छ केल्यावर सिंक पूर्णपणे स्वच्छ होईल.

Whats_app_banner