मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss शस्त्रक्रियेनंतर उद्भवू शकतात या ५ कॉम्प्लिकेशन, जाणून घ्या हे टाळण्यासाठी योग्य केंद्र कसे निवडावे

Weight Loss शस्त्रक्रियेनंतर उद्भवू शकतात या ५ कॉम्प्लिकेशन, जाणून घ्या हे टाळण्यासाठी योग्य केंद्र कसे निवडावे

May 29, 2024 11:28 PM IST

Weight Loss Surgery: बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेट लॉस सर्जरी करतात. पण अनेक वेळा या नंतर काही समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी योग्य केंद्र निवडण्यासाठी हे टिप्स पाहा.

वेट लॉस शस्त्रक्रियेनंतर निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन
वेट लॉस शस्त्रक्रियेनंतर निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन (unsplash)

Complications Occur After Weight Loss Surgery: वजन कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया अर्थात वेट लॉस सर्जरी हे अतीलठ्ठपणाची समस्या असलेल्या व्यक्तींच्या सर्वसाधारण आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. मात्र पुरेशी दक्षता न घेतल्यास शस्त्रक्रियेनंतर काही कॉम्प्लिकेशन उद्भवण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी सर्वत्र सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या, जोखमी व सुरक्षेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणाऱ्या बेरिअॅट्रिक प्रक्रियांचे वेगळेपण नेमके कशामध्ये असते आणि जिथला कर्मचारी वर्ग या शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढवून जास्तीत जास्त चांगले परिणाम मिळवून देईल. असे योग्य बेरिअॅट्रिक केंद्र निवडून हे जोखीम व सुरक्षेचे प्रश्न कशाप्रकारे टाळता येतील याची माहिती आपल्याला असायला हवी. खराडी, पुणे येथील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार बेरिअॅट्रिक अँड मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी डॉ. सुधीर जाधव यांनी याबाबत काही टिप्स सांगितल्या आहेत

ट्रेंडिंग न्यूज

कोणत्या समस्या उद्भवतात

पोषणातील कमतरता

पोटाची क्षमता कमी झाल्याने पोषक घटक शरीरात शोषले जाण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर अत्यंत नियमित फॉलो-अप चेकअप व दिर्घकाल सप्लिमेंटेशन घेण्याची गरज असते. अन्न पोटातून भरभर पुढे गेल्याने मळमळणे, उल्टी, घाम येणे, डायरिया वा डम्पिंग सिंड्रोम म्हणून ओळखली जाणारी एक स्थिती उद्भवू शकते.

डम्पिंग सिंड्रोम

डम्पिंग सिंड्रोममध्ये पोट खूप वेगाने रिकामे केले जात असल्याने मळमळणे, उलट्या, घाम येणे आणि डायरियासारखी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे आहारात काही तडजोडी करणे हे या शस्त्रक्रियात्मक प्रक्रियेनंतर महत्त्वाचे ठरते.

उदरांत्राशी निगडित समस्या

काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर पित्ताशयात खडे होणे (गॉलस्टोन्स), पित्तामुळे घशात जळजळणे (अॅसिड रिफ्लक्स) किंवा मलावरोध यांसारख्या उदर व आतड्यांशी संबंधित अर्थात गॅस्ट्रोइन्टेस्टिनल समस्या उद्भवू शकतात. साधारणपणे गॉलस्टोन्स तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी इतर सप्लिमेंट्सच्या साथीने UDCA घेण्यास सांगितले जाते. काही रुग्णांमध्ये स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमीनंतर अॅसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते.

अंतर्गत गळती

स्टेपल केलेल्या जागी किंवी टाके घातलेल्या जागी गळती होऊ शकते व त्यासाठी अतिरिक्त शस्त्रक्रियेची गरज लागते. अनुभवी सर्जन्सची निवड करून आणि शस्त्रक्रियेनंतर दिलेल्या सूचनांचे पालन करून हा धोका कमी करता येतो.

स्ट्रिक्चर्स

स्कारिंग म्हणजे व्रणांमुळे पोटाची पिशवी किंवा आतड्यांशी जोडणारा मार्ग अरुंद होऊ शकतो. त्यामुळे अन्न गिळायला त्रास होऊ शकतो व उलट्या होऊ शकतात. नियमित तपासण्यांच्या माध्यमातून या समस्येचे लवकरात लवकर निदान होणे अत्यावश्यक आहे.

पित्ताशयातील खडे

वेगाने वजन कमी झाल्याने पित्ताशयात खडे निर्माण होण्याचा धोका वाढतो व त्यामुळे तीव्र वेदना होतात. या समस्याचे वेळच्या वेळी निदान होणे व गरज भासल्यास हे खडे काढून टाकणे आवश्यक ठरू शकते.

जोखीम कमी करण्यासाठी खबरदारी म्हणून केंद्र निवडताना पुढील गोष्टींची काळजी घ्या

तज्ज्ञत्वः बेरिअॅट्रिक प्रक्रियेचा भरपूर अनुभव आणि यशस्वीतेचे उच्च प्रमाण असलेले सर्जन्स

आधुनिक तंत्रज्ञान: आधुनिक लॅप्रोस्कोपिक पद्धतींमुळे शरीराचा कमीत कमी छेद घेत शस्त्रक्रिया करणे शक्य होते आणि रुग्ण तुलनेने लवकर पूर्ववत होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग