Republic Day Parade Tickets Online Booking: २६ जानेवारी अवघ्या काही दिवसांवर आला आहे. प्रजासत्ताक दिन प्रत्येक भारतीयांसाठी फार अभिमानाचा दिवस असतो. याच दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला. याच खास दिनानिमित्त दिल्ली विजय चौकात विशेष परेडचेही आयोजन करण्यात येते. यंदा २६ जानेवारीला सकाळी १० वाजता विजय चौकातून परेड सुरू होईल. ही परेड नॅशनल स्टेडियमवर येऊन संपेल. ही परेड एकूण ४० किलोमीटरची असेल. तुम्हाला ही परेड तिकडे जाऊन पाहायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी आधीच तुमची जागा बुक करावी लागेल. प्रत्यक्ष अनुभव घेणे फारच आनंदायी असेल.
हे लक्षात घ्या की तुम्हाला परेड सुरू होण्यापूर्वी ९.३० लाच विजय चौकात पोहोचावे लागेल. प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करू शकता.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तुम्ही २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत तिकीट बुक करू शकता. याचे बुकिंग १० जानेवारीपासून तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. हे लक्षात घ्या की रोज फक्त काहीच मर्यादित जागा बुक केल्या जातात. चला जाणून घेऊयात प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तुम्ही ऑनलाइन तिकीट कसे बुक करू शकता ते..
> संरक्षण मंत्रालयाच्या www.aaamantran.mod.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
> आता तुम्हाला नवीन खाते तयार करायचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, बर्थ डेट यांसारखी वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
> यापुढे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. तुम्हाला ओटीपी भरून पुढे प्रोसेस करायची आहे.
> आता तुम्हाला ज्या कार्यक्रमासाठी रिपब्लिक डे परेड, बीटिंग रिट्रीट सारखे तिकीट बुक करायचे आहे तो कार्यक्रम निवडायचा आहे.
> तिकीट बुकिंगसाठी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करा. सोबतीला आयडी प्रूफ देखील टाका.
> शेवटच्या टप्प्यात तुम्हाला तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)