Pregnancy मध्ये आनंदी राहिल्याने बाळावर होतो चांगला परिणाम, उपयोगी पडतील या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy मध्ये आनंदी राहिल्याने बाळावर होतो चांगला परिणाम, उपयोगी पडतील या टिप्स

Pregnancy मध्ये आनंदी राहिल्याने बाळावर होतो चांगला परिणाम, उपयोगी पडतील या टिप्स

Published Sep 22, 2023 08:36 PM IST

Pregnancy Tips: गरोदरपणात प्रत्येक जण होणाऱ्या आईला आनंदी राहण्याचा सल्ला देतात. यामुळे गर्भातल्या बाळाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. जाणून घ्या सविस्तर.

प्रेग्नेंसीमध्ये आनंदी राहण्यासाठी टिप्स
प्रेग्नेंसीमध्ये आनंदी राहण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips To Be Happy During Pregnancy: गरोदरपणात महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे त्यांना थकवा आणि तणाव जाणवू लागतो. या काळात काही वेळा महिलांमध्ये मूड स्विंग देखील होतो. गरोदर महिलांमध्ये मूड स्विंग होणे सामान्य आहे. त्यामुळे त्यांना चिडचिड, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग येणे, तणाव, आत्मविश्वासाचा अभाव, मनातील नकारात्मक विचार अशा अनेक गोष्टींचा त्रास होऊ लागतो. हीच वेळ असते जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी प्रेग्नेंट स्त्रीला आनंदी राहण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गर्भातल्या बाळाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तुम्हीही गर्भधारणेदरम्यान कसे आनंदी राहावे हे शोधत असाल तर हे उपाय तुम्हाला मदत करू शकतात.

गरोदरपणात आनंदी राहण्याचे उपाय

प्रत्येक दिवस समजा खास

गर्भधारणेचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास असतो. परंतु अनेक वेळा महिलांना त्यांच्या गर्भातील बाळाच्या भविष्याचा विचार करून तणाव जाणवू लागतो. ज्याचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भविष्याची चिंता आत्ताच न केल्यास बरे होईल. प्रत्येक दिवस सामान्य दिवसाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. दररोज काहीतरी खास करून तुमचा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करा.

योग आणि ध्यानाची मदत घ्या

गरोदरपणात तुमच्या मनातील वाईट विचार दूर ठेवण्यासाठी तुम्ही योगा आणि ध्यानाची मदत घेऊ शकता. एनसीबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या एका संशोधनानुसार गर्भधारणेदरम्यान योगा केल्याने तणाव, चिडचिड आणि थकवा यापासून आराम मिळतो. मात्र योगासने करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैद्यकीय सल्ल्यानंतरच तज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम किंवा योगासने करा.

पुस्तके वाचा

जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुमचा मूड सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्ही गर्भधारणेशी संबंधित किंवा प्रेरक पुस्तक वाचू शकता. असे केल्याने गर्भवती महिलेला गर्भधारणेच्या शारीरिक बदलांपासून ते प्रसूतीपर्यंतच्या सर्व टप्प्यांसाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यास मदत होईल.

 

निरोगी जीवनशैली फॉलो करा

गर्भधारणेच्या वेळी स्त्रीच्या शरीरात शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल बदल होतात. त्यामुळे थकवा जाणवू लागतो. अशा वेळी गर्भवती महिला तिच्या आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच हेल्दी जीवनशैलीचा फॉलो करून आपला मूड चांगला ठेवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner