Tomato Beauty Benefits: सनबर्नपासून अँटी एजिंगपर्यंत, चेहऱ्यावर टोमॅटो लावण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tomato Beauty Benefits: सनबर्नपासून अँटी एजिंगपर्यंत, चेहऱ्यावर टोमॅटो लावण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Tomato Beauty Benefits: सनबर्नपासून अँटी एजिंगपर्यंत, चेहऱ्यावर टोमॅटो लावण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Published Mar 28, 2024 12:16 PM IST

Beauty Tips: टोमॅटो तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकतो. टोमॅटो चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकते. जाणून घ्या टोमॅटोचे ब्युटी बेनिफिट्स.

टोमॅटोचे ब्युटी बेनिफिट्स
टोमॅटोचे ब्युटी बेनिफिट्स (freepik)

Beauty Benefits of Tomato: भाज्यांची चव वाढवण्यापासून ते सॅलड प्लेट्स सजवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा अनेक वेळा वापर केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की टोमॅटो तुमच्या पार्लरचा महागडा खर्च अर्धा करून तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकतो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात. हे त्वचेला टाइट आणि ग्लोइंग ठेवतात आणि झटपट ग्लोही देतात. टोमॅटोचा गर किंवा रस चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकून टॅनिंग आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करू शकतो. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर टोमॅटो लावल्याने आपल्याला कोणते सौंदर्य फायदे मिळतात.

हे आहेत टोमॅटोचे ब्युटी बेनिफिट्स

कोरडी त्वचा मऊ बनते

जर्नल ऑफ डर्मेटोलॉजिकल सायन्सनुसार शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे कोरडी त्वचा आणि एक्जिमा होऊ शकतो. अशा परिस्थितीत टोमॅटो नॅचरल हीलरसारखे काम करते. त्वचेला कोरडेपणापासून वाचवून त्वचा मॉइश्चराइज ठेवण्यास मदत करतो. हा उपाय करण्यासाठी १ चमचा टोमॅटोच्या रसात समान प्रमाणात मध मिसळा. आता हे ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. हा उपाय केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमकही कायम राहते.

डेड स्किनपासून सुटका

टोमॅटोचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. टोमॅटोमध्ये भरपूर एन्झाइम असतात, जे त्वचेवर एक्सफोलिएटर म्हणून काम करतात. डेड स्किनपासून आराम मिळवण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. डेड स्किन स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोचा लगदा थेट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने पाण्याने धुवा.

अँटी-एजिंग गुणधर्म

टोमॅटोमध्ये असलेल्या अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे ते चेहऱ्यावरील डाग, फाइन लाइन, सुरकुत्या इत्यादी कमी करण्यास मदत करते. हा उपाय करण्यासाठी टोमॅटोचा रस इतर घटकांमध्ये मिक्स करा आणि फेस पॅक म्हणून वापरा.

सनबर्नपासून आराम

टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए त्वचेला ताजे आणि गोरा लुक देऊ शकते. इतकेच नाही तर त्याच्या नियमित वापराने सनबर्न देखील बरं होऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला टोमॅटोच्या रसामध्ये ताक मिसळून चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावावे लागेल. त्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner