Tips to Remember While Applying Sunscreen: उन्हाळ्यात स्किन केअरचा विचार केला तर पहिले नाव सनस्क्रीनचे घेतले जाते. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे सनबर्न आणि सनटॅनची समस्या उद्भवते. हे टाळण्यासाठी लोक दिवसातून अनेक वेळा सनस्क्रीन वापरतात. पण अनेक वेळा सनस्क्रीनशी संबंधित काही चुकांमुळे लोकांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि त्वचेवर डाग दिसू लागतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यातही त्वचेची चमक कायम ठेवायची असेल तर सनस्क्रीन लावताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी लोक अनेकदा सनस्क्रीन लोशन फक्त चेहऱ्यावर लावतात. परंतु सनस्क्रीन लोशन नेहमी शरीराच्या सर्व उघड्या भागांवर समान रीतीने लावावे. असे केल्याने त्वचेला उन्हापासून पूर्ण संरक्षण मिळते. असे केले नाही तर त्वचेच्या खुल्या भागांवर सनबर्न आणि टॅनिंग होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर डाग पडू शकतात.
सनस्क्रीन खरेदी करण्यापूर्वी ते कोणत्या प्रकारच्या सन फिल्टरपासून बनलेले आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम ऑक्साईडसारखे फिजिकल किंवा मिनरल फिल्टर्स असलेले सनस्क्रीन नेहमी खरेदी करा.
अनेकदा लोक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरतात. पण हे पुरेसे नाही. सनस्क्रीन फक्त उन्हातच नाही तर थंड वातावरणात, पावसाळ्यात, पूल जवळ, फिरायला जाताना आणि बंद खोलीत असताना किंवा घरात असतानाही लावले पाहिजे. जर तुम्ही जास्त वेळ बाहेर असाल तर दिवसातून दोनदा सनस्क्रीन लावा.
जरी तुमचा सनस्क्रीन एक्सपायरी डेटला पोहोचला नसेल, तरीही जुने सनस्क्रीन वापरणे टाळा. जुने सनस्क्रीन वापरल्याने सनबर्न होऊ शकते. लक्षात ठेवा की कोणताही सनस्क्रीन फक्त दोन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वापरा.
सनस्क्रीन लावताना योग्य एसपीएफ निवडणे फार महत्वाचे आहे. यासाठी, तुम्ही एसपीएफ ३० ते एसपीएफ ५० पर्यंत दिवसा लावू शकता. पण जर तुम्ही पोहायला जात असाल तर एसपीएफ १०० लावणे जास्त चांगले असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)