मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Olive Oil for Skin: डल स्किनसाठी रामबाण आहे ऑलिव्ह ऑइल, ही आहे लावण्याची योग्य पद्धत

Olive Oil for Skin: डल स्किनसाठी रामबाण आहे ऑलिव्ह ऑइल, ही आहे लावण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2023 10:58 AM IST

How to Apply Olive Oil: ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेवर ते लावल्याने अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या ते कसे लावावे आणि त्याचे काय फायदे होतात.

त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइलचे फायदे
त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइलचे फायदे

Benefits of Olive Oil for Skin: ऑलिव्ह ऑइल हा त्वचेच्या समस्यांना तोंड देण्याचा नैसर्गिक मार्गआहे. त्वचा चमकदार, मऊ, गुळगुळीत आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हळद आणि ऑलिव्ह ऑइलच्या मिश्रणाचा त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. हे शरीराला पोषक आणि जीवनसत्त्वे देते, जे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते. हळद आणि ऑलिव्ह ऑइल कसे लावायचे ते पहा-

हे तेल कसे लावायचे

ग्लोइंग स्किन आणि चेहऱ्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. चमकदार त्वचेसाठी तुम्ही एक कप ऑलिव्ह ऑइलमध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करू शकता. ते एका डब्यात साठवा आणि आंघोळ करण्यापूर्वी दररोज या तेलाने मालिश करा.

त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइलचे फायदे

त्वचा हायड्रेट होईल

ऑलिव्ह ऑइल हे फॅटी अॅसिड आणि अँटि ऑक्सिडंट्ससाठी ओळखले जाते. हे तेल ओलावा लॉक करते, जे हायड्रेशनसाठी उत्तम आहे.

जळजळ होते कमी

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ईसह अँटि ऑक्सिडंट्स असतात. हे अँटि ऑक्सिडंट्स मुरुम किंवा सोरायसिसमुळे होणारा लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

पफीनेस होते कमी

डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी तळहातावर ऑलिव्ह ऑईल घेऊन ते लावा.

कोरडी त्वचा शांत करणे

ऑलिव्ह ऑइल कोरडी त्वचा आणि सोरायसिस आणि एक्जिमा या दोन्हींमुळे होणारी जळजळ दूर करण्यास मदत करू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग