Honey Face Pack for Fresh Skin: त्वचेला डीप मॉइश्चरायझिंग करण्यासाठी मध खूप चांगले आहे. त्वचेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी देखील तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हनी फेस पॅक बनवू शकता. मधामध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मधाचा वापर करता येतो. उन्हाळ्यात फ्रेस त्वचा मिळवण्यासाठी मधापासून फेस पॅक कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या
या अप्रतिम घरगुती फेस पॅकने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता. यासाठी केशरचे काही काड्या एक चमचा मधात सुमारे १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर ते चांगले मिक्स करा. हे चांगले मिक्स झाल्यानंतर हे मध चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने आणि फेस वॉशने चेहरा धुवा.
त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी आपण मध आणि कॉफीपासून फेस मास्क बनवू शकता. यामुळे तुमची त्वचा पुन्हा फ्रेश होईल. हे बनवण्यासाठी एक चमचा कॉफीमध्ये एक चमचा मध मिक्स करा. नंतर हे आपल्या चेहऱ्यावर लावून मालिश करा. साधारण १० मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.
त्वचेला डीप मॉइश्चराइझ करण्यासाठी हा फेस पॅक १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. फेस पॅक बनवण्यासाठी अर्धी केळी मॅश करा आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे ठेवल्यानंतर मास्क पुसून टाका आणि पाण्याने आपला चेहरा धुवा.
हे बनवण्यासाठी एक चमचा किसलेली काकडी एक चमचा मधात मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनंतर रुमालाने पुसून नंतर पाण्याने धुवा.
त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी एक चमचा पपईच्या पल्पमध्ये एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. त्यानंतर १५ मिनिटे राहू द्या. नंतर पुसून टाका आणि पाण्याने आणि फेस वॉशने चेहरा धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)