Homemade Face Pack for Skin Brighten: होळीनंतर त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. या काळात रंगांचा वापर केल्याने त्वचेला हानी होते. रंगांमुळे त्वचा अतिशय निर्जीव आणि कोरडी होते. अशा परिस्थितीत होळीला रंग खेळल्यानंतर जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल आणि तिची चमक गेली असेल तर तुम्ही हा फेस पॅक लावून तुमच्या चेहऱ्याची हरवलेली चमक परत मिळवू शकता. पाहा कसा बनवायचा हा फेस पॅक
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडर एक चमचा तांदळाच्या पिठात मिक्स करा. त्यात एक चमचा गुलाब पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा आणि कोरडा होईपर्यंत ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवा. हा पॅक लावल्यानंतर त्वचेला थंडावा जाणवेल आणि चेहऱ्याची चमक परत येईल.
मुलतानी मातीचा फेस पॅक बनवण्यासाठी मुलतानी मातीमध्ये २ चमचे टोमॅटोचा रस मिक्स करा. त्यात थोडे बदामाचे तेल टाकून फेस पॅक बनवा. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. ते सुकल्यावर चेहरा धुवा. हा फेस पॅक नियमितपणे लावा. काही दिवसातच चेहऱ्याची चमक परत येईल.
त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी दही प्रभावी आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी दह्यात मध मिक्स करा. त्यात थोडी हळद मिसळून पेस्ट बनवा. आता स्वच्छ चेहऱ्यावर फेस पॅक लावा. थोडा वेळ चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर धुवा. हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याची हरवलेली चमक परत देईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)