Coffee Face Pack: वयानुसार चेहऱ्याच्या त्वचेवर सूज आणि सैलपणा दिसू लागतो. अशा परिस्थितीत महागड्या ट्रीटमेंट घेणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. पण यासाठी काही घरगुती उपाय खूप उपयुक्त आहेत. आपण फक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. कॉफी त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि त्याचा फेस पॅक त्वचा तरुण दिसण्यास मदत करतो. कॉफी फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा सैलपणा दूर होतो. तसेच डार्क सर्कलची समस्या देखील दूर होते. जाणून घ्या कॉफीचा फेस पॅक कसा तयार करायचा आणि लावायचा.
- चेहऱ्याच्या त्वचेवर डेड स्किन दिसत असेल
- त्वचेवर ढिलेपणा आणि सुरकुत्या दिसू लागल्या असतील
- त्वचेमध्ये कोरडेपणा आणि डिहायड्रेशन होत असेल
- चेहरा निस्तेज आणि डल दिसत असल्यास
- कॉफी फेस पॅकमुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल देखील दूर होतात.
चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसत असतील तर कॉफी फेस पॅक तुमची मदत करेल. कॅफिन त्वचेची छिद्रे घट्ट होण्यास मदत करते. तसेच त्वचेला फ्रेशनेस देण्यास मदत होते. कॉफी फेस पॅक लावण्यासाठी एक चमचा कॉफी ग्राउंड घ्या. त्यात एक चमचा मध मिक्स करा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. सुमारे २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. मध त्वचेला आतून हायड्रेट आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. तसेच त्वचेची चमक कायम राहील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या