Success Mantra: यशस्वी लोक अपयशाला सामोरे जाताना काय विचार करतात? जाणून घ्या काय सांगतायत जया किशोरी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Success Mantra: यशस्वी लोक अपयशाला सामोरे जाताना काय विचार करतात? जाणून घ्या काय सांगतायत जया किशोरी

Success Mantra: यशस्वी लोक अपयशाला सामोरे जाताना काय विचार करतात? जाणून घ्या काय सांगतायत जया किशोरी

Mar 11, 2024 11:39 PM IST

Success Tips: जीवनात अपयश आणि यश हे सुरुच असते. पण शहाणा व्यक्ती तो असतो जो अपयशातून शिकतो आणि भविष्यात यशस्वी होतो. यशस्वी व्यक्तीचे विचार काय असतात हे जया किशोरी सांगत आहेत.

यशस्वी व्यक्ती अपयशाला सामोरे जाताना कसा विचार करतात
यशस्वी व्यक्ती अपयशाला सामोरे जाताना कसा विचार करतात (unsplash)

How Successful People Thought About Failure: आयुष्यात यश आणि अपयश येत-जात असतात. पण पुढे जाण्यासाठी चुकांमधून शिकणे खूप महत्त्वाचे आहे. या संदर्भात मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी सांगतात की, यशस्वी लोकांच्या कोणत्या सवयी असतात ज्या त्यांना आयुष्यात अपयशानंतर यश मिळवण्यास मदत करतात. यशस्वी व्यक्ती कधीही अपयशाचा स्वीकार करून बसून राहत नाही तर या मार्गांनी विचार करतो. त्यामुळे त्याला यश मिळते. यशस्वी व्यक्ती कशा प्रकारे विचार करते ते जाणून घ्या.

यशस्वी व्यक्तीचा विचार करण्याचे मार्ग

जया किशोरी सांगतात की, जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते, तेव्हा त्याने भूतकाळात या मार्गांचा विचार केला असावा. त्यामुळेच त्याला आज यश मिळाले आहे.

- ते का घडले नाही

- काय चुकले

- कुठे चुकले

- काय करायचे राहिले

- काय शिकायचे राहिले

- काय बाकी आहे

यशस्वी लोक असा करतात विचार

यशस्वी व्यक्तीची विचार करण्याची पद्धत अशीच असते जेव्हा तो अयशस्वी होतो. वागण्यातला बदल हा विचार करण्याच्या पद्धतीतच दिसून येतो. आपली विचार करण्याची पद्धतच यशाकडे घेऊन जाते. जया किशोरी सांगतात की चाणक्य नीतीमध्ये विचार करण्याच्या तीन पद्धती सांगितल्या आहेत. ज्याचे पालन केल्याने जीवनात यश मिळवणे सोपे होते.

पहिले म्हणजे कारण शोधणे

विचार करण्याचा पहिला मार्ग म्हणजे तुमच्या अपयशाचे कारण शोधणे. उदाहरणार्थ तुम्ही परीक्षा पास झाली नाही तर तुम्ही दु:खी होता. पण दु:खाचे कारण परीक्षा पास होण्याचे नसून कोणत्या गोष्टीची उणीव होती ते शोधणे हे आहे, ज्यामुळे परीक्षा पास झाली नाही.

स्ट्रेटजी तयार करणे

दुसरी स्टेप म्हणजे स्ट्रेटजी, धोरण तयार करणे. तुमच्या आधीच्या चुकांमधून पुढे जाणे आणि स्ट्रेटजी बनवणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून भविष्यात तीच चूक पुन्हा होणार नाही आणि त्यांच्याकडून धडा घेऊन पुढे जाल. रणनीती बनवण्याची प्रक्रिया यशस्वी व्यक्तीच्या मनात नेहमीच येते.

स्वतःमध्ये दोष शोधणे

जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो प्रथम त्याच्या चुकीसाठी इतरांना दोष देतो. पण तोच यशस्वी होतो जो स्वतःच्या उणीवा शोधतो. जेणेकरून त्यावर मात करून यश मिळवता येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner