Water Consumption: आपल्या शरीरात सर्वाधिक पाणी असते. त्यामुळे आपल्या पाण्याचा इंटेक उत्तम असणे अर्थात योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, अवयव आणि पेशी योग्यरित्या कार्य करत राहण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. आपली शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि त्याला वंगण घालण्यासाठी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता झाली तर, किडनी स्टोन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजार होतात. याशिवाय झोपेसाठी आणि चांगल्या मूडसाठी पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात सहज तहान लागत नाही. याशिवाय घाम येत नाही. त्यामुळेच हिवाळ्यात किती पाणी प्यावे असा प्रश्न नेहमी लोकांना पडतो. यामुळे तुम्हाला हिवाळ्यात किती पाणी प्यावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
> हिवाळ्यात तहान लागत नाही याचा अर्थ असा नाही की शरीर हायड्रेटेड आहे. हिवाळ्यात शरीर हाइड्रेटेड झाले आहे हे लक्षातच येत नाही. या ऋतूत थंडी असते आणि घाम येत नाही. त्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. पण पाणी कमी पडल्यामुळे त्वचा क्रॅक होते. त्यामुळे थंडीतही पाणी पिणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
> थंडीत शरीर हायड्रेटेड न राहिल्याने ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते. जेव्हा शरीरात द्रव अन्नाची कमतरता असते, तेव्हा तुमचे शरीर नेहमीपेक्षा जास्त थकल्यासारखे आणि अशक्त वाटू शकते.
> हिवाळ्यात असंच पाणी प्यावंसं वाटत नसेल तर गरम पेये जास्त प्रमाणात प्या.
> हिवाळ्याच्या महिन्यांत संसर्गजन्य रोग होतात. यामागचं कारण पुरेसे हायड्रेटेड नसल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याच कारणांमुळे हिवाळ्यातही पाणी पिणे गरजेचे आहे.
> हिवाळ्यात दिवसातून ६ ते ८ ग्लास पाणी प्या. तपण हे लक्षात घ्या की, वेगवेगळ्या लोकांना हायड्रेटेड राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या