How much fat does exercise lose: आपले शरीर मजबूत करण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी आपण करू शकता असा सर्वात प्रभावी व्यायाम म्हणजे स्क्वॅट्स. अभिनेत्री करिना कपूरची डायटीशियन ऋजुता दिवेकर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अधोरेखित केले आहे की स्क्वॅट्स साधे दिसतात याचा अर्थ असा नाही की ते करणे सोपे आहे. खरं तर, ते चुकीचे करण्याचे बरेच मार्ग आहेत.
तिच्या म्हणण्यानुसार, 'तुम्ही किती कॅलरीज बर्न कराल आणि तुमची चरबी किती कमी होईल' हे तुम्ही योग्य व्यायाम करत आहात की नाही यावर अवलंबून आहे. ती म्हणाली की दुखापत टाळण्यासाठी आणि आपल्या फिटनेसचा प्रभाव वाढवण्यासाठी योग्यप्रकारे स्क्वॅट्स किंवा इतर कोणताही व्यायाम कसा करावा हे शिकणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीमुळे तुमच्या सांधे आणि स्नायूंवर अनावश्यक ताण येऊ शकतो. आणि स्नायूंच्या दुखापतीचा धोका वाढू शकतो.
याबाबत बोलताना ऋतुजा म्हणाली, "आपल्या शरीराची ताकद वाढवण्यासाठी, चरबी कमी होण्यासाठी, स्नायूंसाठी, लठ्ठपणा कमी होण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. पण जर तुम्हाला त्याचे फायदे घ्यायचे असतील, आणि दुखापती आणि आरोग्याच्या इतर समस्या टाळायच्या असतील तर योग्य व्यायाम करणे जास्त महत्त्वाचे आहे." त्यानंतर तिने तिच्या अलीकडील जिम व्हिडिओंपैकी एकामध्ये तिच्या स्क्वॅट वर्कआउटची चर्चा केली आहे. यामध्ये तिने लक्षात ठेवण्यासाठी तीन 'आर' या नियमांबद्दल चर्चा केली आणि अगदी सामान्य स्क्वॅटिंग चुका देखील शेअर केल्या आहेत.
ऋतुजा पुढे म्हणाली, “तुम्हाला व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी, तीन आर चा नियम म्हणजेच व्यायामाचा वेग, पुनरावृत्ती आणि विश्रांती हे महत्वाचं आहे. व्यायाम करताना पहिलाआपल्याला व्यायामाच्या गतीवर लक्ष द्यावे लागेल. सोबतच स्क्वॅट करताना तुमचे नितंब तुमच्या गुडघ्याखाली आला पाहिजे. तुमचे गुडघे वरच्या रेषेत असले पाहिजेत, तुमच्या पायाची बोटे आणि नितंबांच्या दिशेने फिरताना खाली आले पाहिजे. जेव्हा आपण योग्य पद्धतीने आणि पूर्ण गतीने व्यायाम करतो, तेव्हा चुकीच्या पद्धतीने केलेल्या १०० पुनरावृत्तींपेक्षा एक पुनरावृत्ती जास्त प्रभावी असते.
ऋतुजाने तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, "तुम्ही किती कॅलरी बर्न कराल, तुम्ही किती चरबी कमी कराल शिवाय तुम्ही किती सडपातळ दिसाल हे या ३ आर च्या नियमांवर अवलंबून आहे. अर्थातच तुम्ही किती वेगाने व्यायाम करत आहेत. तुम्ही कितीवेळा त्या व्यायामाची पुनरावृत्ती करत आहात आणि तुम्ही यादरम्यान किती विश्रांती घेत आहात. या तीन घटकांवर तुमची चरबी किती घटते हे अवलंबून असते.
आपण योग्यरित्या स्क्वॅट करत आहात की नाही याची अद्याप खात्री नाही? अशावेळी योग्य प्रकारे स्क्वॅट करण्यासाठी, तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे हे आधी समजून घ्या. त्यासाठी २०२२ मध्ये, फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहित, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना प्रशिक्षण देण्यासाठी ओळखली जाते, त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. स्क्वॅट्समध्ये काय करावे आणि काय करू नये याचे प्रात्यक्षिक करतानाचा हा एक छोटा व्हिडिओ आहे.तो तुम्ही नक्की पाहावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)