Fitness Tips: सध्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरु आहे. पण अजूनही मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी रंगलेला न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना न विसरता येणार आहे. काल भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध सिंहासारखा उपांत्य फेरीचा सामना खेळला. मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही मोहम्मद शमीने सर्वोत्तम कामगिरी केली होती. एकदा शमीने विकेट्स घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला कोणीच रोखू शकले. काल शमीने न्यूझीलंडकडून ५७ धावांत ७ बळी घेतले. वेगवान गोलंदाजाला नेहमीच तंदुरुस्त राहावे लागते, म्हणूनच मोहम्मद शमीच्या या अविश्वसनीय खेळीचे श्रेय त्याच्या प्रशिक्षण, फिटनेस आणि उत्तम आहाराला जाते. मोहम्मद शमी फिटनेस राखण्यासाठी काय करतो ते जाणून घ्या.
यशाचा मार्ग शमीसाठी इतका सोपा नव्हता. कौटुंबिक समस्यांशी झुंज दिल्यानंतर तो अनेकवेळा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याची स्थिती अशी झाली की त्याचे वजन खूप वाढले, तर टी-२० वर्ल्ड कपमध्येही शमीचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. अशा स्थितीत २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण शमीने अप्रतिम पुनरागमन केले आणि याचे संपूर्ण श्रेय त्याच्या फिटनेसला जाते.
डाएटबद्दल बोलायचे झाले तर शमीला देसी फूड खायला आवडते. तो जंक आणि फास्ट फूडपासून लांब राहतो. शमी इंटरमिटेंट फास्टिंग करतो. हा असा आहार आहे ज्यामध्ये फास्टिंग वेगळ्या पद्धतीने केला जातो. या फास्टिंग केल्याने तुमचे वजन तर कमी होईलच पण तुमचे शरीरही लवचिक होईल. शमीला बिर्याणी खायला आवडते पण फिटनेसमुळे तो खात नाही.
शमी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी घरगुती प्रशिक्षण घेतो. पण त्याने आपल्या प्रशिक्षणात गरजेनुसार आणि फिटनेस राखण्यासाठी बदलही केले आहेत. शमी जिममध्ये वेट ट्रेनिंगही करतो, ज्यामुळे त्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते. यासोबतच तो स्टॅमिना वाढवण्यासाठी कार्डिओ आणि हाय इंटेन्सिटी वर्कआउटही करतो. पायांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, पाठीच्या खालचा व्यायाम करतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)