Jogging: दररोज इतके मिनिटे करा जॉगिंग, हृदय आणि फुफ्फुसांसाठी आहे फायदेशीर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Jogging: दररोज इतके मिनिटे करा जॉगिंग, हृदय आणि फुफ्फुसांसाठी आहे फायदेशीर!

Jogging: दररोज इतके मिनिटे करा जॉगिंग, हृदय आणि फुफ्फुसांसाठी आहे फायदेशीर!

Dec 07, 2023 10:35 AM IST

Fitness Mantra: सकाळी जॉगिंग करणे हा निरोगी राहण्यासाठी करावा असा बेस्ट व्यायाम आहे.

Health Care
Health Care (Freepik)

Healthy Lifestyle: आजकाल आपली जीवनशैली खूप बदली आहे. बैठी जीवनशैली अनेकजण फॉलो करतात. अनेकांचा संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसून जातो. अशा लाइफस्टाइलमुळे आपण अनेक आजार जडत आहेत. अशा परिस्थितीत, तज्ञ अनेकदा लोकांना शारीरिक ऍक्टिव्हिटी वाढवण्याचा सल्ला देतात. शक्य असल्यास फक्त रोज थोडा वेळ काढून फिरायला किंवा जॉगिंगला जायला हवं. आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जॉगिंगमुळे शरीरासोबतच मनही निरोगी राहते.

वजन नियंत्रणात राहते

आजकाल रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, जास्त जंक फूड खाणे आणि शारीरिक हालचाली न करणे यामुळे लोकांचे वजन वाढू लागले आहे. तुम्ही दररोज फक्त ३० मिनिटे जॉगिंगसाठी काढले तर तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात राहू शकता.

वेदनांपासून दूर राहाल

कंबर, पाठदुखी अशा समस्या अनेकांना आहेत. अशावेळी दररोज जॉगिंग केल्याने तुम्हाला या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल.

हृदय आणि फुफ्फुसे ठीक राहतील

दररोज जॉगिंग केले तर हृदय आणि फुफ्फुसांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत होईल. याशिवाय, हृदयाचे स्नायू देखील मजबूत होतात ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

फक्त ३० ते ४० मिनिटे मॉर्निंग वॉक केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजनही शरीरात पोहोचतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

या गोष्टी लक्षात ठेवा

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जॉगिंग करण्यापूर्वी हलका वॉर्म-अप करा. यामुळे शरीराची हालचाल होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner