Baby Care Tips: नवजात बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी किती कपडे घालावे? तज्ञांकडून जाणून घ्या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Care Tips: नवजात बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी किती कपडे घालावे? तज्ञांकडून जाणून घ्या टिप्स

Baby Care Tips: नवजात बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी किती कपडे घालावे? तज्ञांकडून जाणून घ्या टिप्स

Jan 24, 2024 12:15 AM IST

Winter Care Tips for Baby: नवजात बाळाची काळजी घेताना पालकांना नेहमी प्रश्न पडतो की त्यांना हिवाळ्यात किती कपडे घालावे. हिवाळ्यात थंडीपासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी या काही गोष्टी जाणून घ्या.

हिवाळ्यात बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स
हिवाळ्यात बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Winter Care Tips for Baby: लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे बदलत्या हवामानाचा सर्वात आधी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा आपण नवजात बाळाबद्दल बोलत असतो तेव्हा समस्या आणखी वाढते. बऱ्याचदा पालकांना त्यांच्या नवजात बाळाबद्दल प्रश्न सतत त्रास देतो की त्यांनी त्यांच्या पहिल्या हिवाळ्यात किती कपडे घालावे, जेणेकरून त्यांना थंडीपासून संरक्षण करता येईल. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल, तर बालरोगतज्ञ डॉ. अर्पित गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्याचे उत्तर दिले आहे. डॉ. अर्पित गुप्ता यांनी हिवाळ्यात मुलांना कपडे घालण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. हिवाळ्यात बाळाची काळजी घेण्यासाठी या टिप्स पाहा.

कपड्यांचा पहिला थर सुती असावा

तुमच्या बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी जेव्हा तुम्ही त्याला कपडे घालाल तेव्हा नेहमी पहिला थर हा सुती कापडाचा ठेवा. असे केल्याने बाळाच्या त्वचेला प्रथम कापडाचा स्पर्श झाल्यास मुलाच्या त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका नाही. याचे कारण असे की कापडाचा पहिला थर बाळाच्या त्वचेला स्पर्श करणारा कापड असतो. अशा परिस्थितीत जर कापड लोकरीचे असेल तर मुलांच्या त्वचेवर पुरळ उठू शकते.

उबदार कपड्यांचे किती थर असावेत?

हा प्रश्न बहुतेक पालकांना सतावतो की आपल्या मुलाला थंडीपासून वाचवण्यासाठी किती उबदार कपडे घालणे योग्य आहे. बाळाला थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याचा कंफर्ट टिकवण्यासाठी किती थरांचे उबदार कपडे घालावेत याबाबत डॉ. अर्पित गुप्ता सांगतात की, एक आईने स्वत: थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी जेवढे उबदार कपडे घातले असतील त्यापेक्षा एक जास्त लेअर बाळाला घालावी.

 

कसे ओळखावे की बाळाला आणखी उबदार कपड्याची गरज नाही?

तुमच्या बाळाला त्याने घातलेल्या उबदार कपड्यांमध्ये थंडी वाजत आहे की नाही किंवा थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला जास्त कपडे घालण्याची गरज आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर पद्धत अगदी सोपी आहे. पालकांनी मुलाच्या पायाला किंवा हाताला स्पर्श करून तपासावे. जर बाळाचे तळ हात आणि पायाचे तळवे त्याच्या पोटापेक्षा थंड असतील तर याचा अर्थ असा आहे की तो थंड आहे आणि तुम्ही त्याला कपड्यांचे थर घालू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner