मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Almond Benefits: एका दिवसात किती बदाम खावेत? जाणून घ्या तज्ञांकडून!

Almond Benefits: एका दिवसात किती बदाम खावेत? जाणून घ्या तज्ञांकडून!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 09, 2024 10:36 AM IST

Soaked Almond Eating Benefits: ५ की १० दिवसात किती बदाम खावेत? हा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दलच प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य दीक्षा भावसार- सावलिया यांच्याकडून जाणून घेऊयात.

Winter Health Care
Winter Health Care (freepik)

How many almonds to eat in day: सुक्या मेवा शरीरासाठी किती फायदेशीर असतो हे सगळ्यांचं माहित आहे. यामधला कॉमन सुका मेवा म्हणजे बदाम. बदाम हे अनेक रेसिपीमधेही वापरले जातात. बदाम हा अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक ड्राय फ्रुट आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, लोह, पोटॅशियम, जस्त, बी जीवनसत्त्वे, नियासिन, थायामिन, फोलेट इ. असे पदार्थ असतात. आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार सावलिया यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बदाम खाण्याचे फायदे सांगितले आहे. याशिवाय तिने बदाम खाण्याची योग्य पद्धत याविषयीही एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. चला जाणून घेऊया एका दिवसात किती बदाम खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत.

मिळतात हे फायदे

> आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, जेव्हा तुम्ही बदाम खाता तेव्हा तुम्हाला जास्त ऊर्जा मिळते.

> बदाम खाल्ल्यानंतर तुमची काहीही खाण्याची इच्छा बर्‍याच प्रमाणात कमी होते.

> बदाम खाल्ल्याने महिलांच्या पीरियड्स क्रॅम्पच्या समस्येपासून आराम मिळतो.

> बदाम खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. पोटाचा त्रास होत नाही.

> बदामातील पोषक तत्वे मेंदूचे आरोग्य सुधारतात. स्मरणशक्तीला चालना मिळते.

> अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असल्याने ते त्वचा आणि केसांसाठी खूप चांगले आहे.

> नियमित सेवनाने हृदय निरोगी राहते. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची समस्या होत नाही.

Humming Meditation Benefits: हमिंग मेडिटेशन म्हणजे काय? जाणून घ्या शरीरासाठी किती आहे फायदेशीर!

एका दिवसात किती बदाम खावेत?

रोज बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे सगळ्यांचं माहिती आहे. पण हा प्रश्न पडतो की रोज बदाम दिवसात किती आणि कसे खावेत? याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की, प्रत्येकाची पचनसंस्था आणि गोष्टी पचवण्याची क्षमता वेगळी असते. यामुळे फार विचारपूर्वक तुमचं डाएट असावेत. रोजच्या आहारात बदामाचा समावेश करण्याचा प्रश्न आहे, जर तुम्ही पहिल्यांदाच बदाम खात असाल तर तुम्ही फक्त २ बदाम पाण्यात भिजवलेले खाणे चांगले ठरेल. बदामाची साल काढून खा. जेव्हा तुम्हाला १० दिवस २ बदाम खाण्यास सोयीस्कर वाटत असेल आणि पचनाची कोणतीही समस्या नसेल, तेव्हा तुम्ही ५ बदाम खाणे सुरू करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel