How Long To Meditate To Get Benefits: योग आणि ध्यान हे भारतीय जीवनशैलीचा एक भाग मानले गेले आहे. पण आजकाल नियमितपणे ध्यान आणि योगासने करणारे फार कमी लोक आहेत. काही लोक मेडिटेशन करतात पण त्यांना त्याचा फायदा होत नाही. अशा परिस्थितीत शरीरासाठी किती वेळ ध्यान करणे फायदेशीर आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे तसेच ध्यानसंबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
जसे औषध ठराविक वेळी आणि अंतराने घेतल्यास फायदा होतो. त्याचप्रमाणे ध्यानासाठीही एक निश्चित वेळ आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेबसाइटनुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान २० मिनिटे ध्यान केले तर त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.
ध्यान केल्याने व्यक्तीला मानसिक शांती आणि ऊर्जा मिळते आणि मनात सकारात्मकता जाणवते. वास्तविक दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने शरीरासह मनही थकून जाते आणि ऊर्जाही संपते. अशा स्थितीत मनाला ऊर्जा देण्यासाठी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे.
ध्यानासाठी नेहमी सर्वात कंफर्टेबल जागा निवडा. तसेच बसण्याची मुद्रा देखील पूर्णपणे आरामदायक असावी. जमिनीवर योगा मॅट ठेवून ध्यान करणे आवश्यक नाही. खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसूनही ध्यान करता येते. फक्त लक्षात ठेवा की ध्यान करताना पूर्णपणे स्थिर रहा आणि हलू नका.
ध्यान नियमित केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
- चिंता दूर होते.
- झोप न येण्याची समस्या दूर होते.
- विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
- एकाग्रता वाढते.
- मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात.
- डोकेदुखी आणि नैराश्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)