Jaggery Making Process Viral Video: गूळ सामान्यतः सर्व घरांमध्ये आढळतो. फिटनेसवाले लोक सध्या साखर सोडून गुळाकडे वळेल आहेत. चहा ते अन्य रेसिपी सगळीकडेच गूळ वापरला जातो. हिवाळ्यात तर आवर्जून गूळ खाल्ला जातो. हिवाळ्यातील आनंद देणारा गूळ, देशभरातील बहुतेक लोकांना आवडतो. पण, हा गूळ कसा बनवला जातो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नुकताच एका कारखान्यात गुळाचे उत्पादन दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपने कारखाना आणि कामगारांच्या अस्वच्छ परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
एका कारखान्यात मोठ्या प्रमाणावर गुळाचे उत्पादन होत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @foodiesfab_india या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, कारखान्याचे कामगार मशीनच्या साहाय्याने उसाचा रस काढताना दिसत आहेत, जो नंतर उकळला आहे. जेव्हा रस जास्त उकळतो तेव्हा तो घट्ट होतो आणि नंतर त्यांचं रूपांतर गुळात होते. नंतर ते गुळाचे मिश्रण जमिनीवर ठेवले जाते आणि कामगार त्याचे तुकडे हाताने बनवताना दिसत आहेत.
गूळ बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना, कारखान्यातील एकाही कामगाराकडे सेफ्टी गियर नसल्याचे तुम्ही पाहू शकता. ज्या भांड्यांमध्ये ते गूळ बनवत आहेत तेही अस्वच्छ स्थितीत ठेवले दिसत आहेत.
ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. शेअर केल्यापासून याला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टवर अनेक कमेंट्सही येत आहेत. कारखान्यातील अस्वच्छता पाहून अनेकजण हैराण झाले आहे. "हे सिमेंट लावण्यासारखं आहे," एकाने लिहिले. दुसरा म्हणाला, "सरकार काय करतंय? त्यांना बाजारात हे उत्पादन विकण्याची परवानगी कोणी दिली?" तिसरा म्हणाला, "माझ्या गुळात दगड का आहेत ते आता कळले." चौथ्याने शेअर केले: 'हे घृणास्पद आहे, मी हे खातो यावर विश्वास बसत नाही.' पाचवा म्हणाला, "मग लोक म्हणतात पॅक केलेली शुद्ध साखर टाळा कारण ती आरोग्यासाठी चांगली नाही.पण हे बघून आरोग्यासाठी हे चांगले नाही हे दिसून येते." या व्हिडीओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? आम्हाला कमेंट करून कळवा.