मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joint Pain Relief Oil: हिवाळ्यात सांधेदुखी होईल दूर, घरीच तयार करा हे तेल!

Joint Pain Relief Oil: हिवाळ्यात सांधेदुखी होईल दूर, घरीच तयार करा हे तेल!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 31, 2024 02:34 PM IST

Winter Care: हिवाळ्यात थंडीमुळे संधिवाताची समस्या वाढू लागते आणि यामुळे फारच वेदना होतात. यावर तुम्ही घरीच उपाय करू शकता.

how Get rid of joint pain in winter
how Get rid of joint pain in winter (freepik)

Arthritis Care: हिवाळ्यात थंडी असते ज्यामुळे अनेकांना संधिवाताची समस्या होते. अनेकदा हिवाळ्यात भरपूर कपडे घालतो. यामुळे बरेच दिवस शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही. अगदी कमी तापमानामुळे, सर्दी-खोकला यांसारख्या किरकोळ आजार होतात. या ऋतूमध्ये (winter diseases) लोकांना शरीरात जडपणा, स्नायू आणि सांधे दुखणे सुरू होते. विशेषत: ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हिवाळा खूप त्रासदायक असतो. थंडीमुळे संधिवात असलेल्या लोकांच्या सांध्यामध्ये सूज, लालसरपणा आणि वेदना होतात. यापासून आराम मिळवण्यासाठी आपण घरी तेल तयार करू शकता. सांधेदुखीसाठी घरच्या घरी तेल कसे तयार केले जाऊ शकते ते जाणून घेऊयात...

घरी कसं बनवायचं तेल?

सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तेल तयार करण्यासाठी ४ चमचे मोहरीचे तेल, ५ ते ६ लवंगा, एक चमचे ओवा, ५ ते ६ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मीठ घ्या. हे सर्व साहित्य मंद आचेवर चांगले शिजवा. जेव्हा हा मिश्रणाचा रंग बदलायला सुरू होईल. रंग बदल्यावर हे तेल थंड होऊ द्या. नंतर हे तेल गाळून घ्या. नंतर बाटलीत भरून स्टोअर करून घ्या.

कसे लावावे तेल?

थोडे कोमट करून हे तेल लावावे. बोटाने तेलाने सांध्यांना नीट मसाज करा. हे तेल तुम्हाला सांधेदुखी तसेच शरीरातील इतर ठिकाणी स्नायू दुखण्यापासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहे. मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठीही या तेलाचा वापर करता येतो.

जायफळापासून तेल तयार करा

४ टेबलस्पून मोहरीच्या तेलात एक चमचा जायफळ टाका आणि लसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्यात मिसळा. यानंतर, ढवळत असताना चांगले शिजवा. ते थंड झाल्यावर गाळून डब्यात साठवा. सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळवून देण्यासाठी हे तेल खूप प्रभावी मानले जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel