मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Osteoarthritis Problem: वृद्धांवर कसा होतो ऑस्टियोआर्थरायटिस परिणाम? तज्ञांकडून जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

Osteoarthritis Problem: वृद्धांवर कसा होतो ऑस्टियोआर्थरायटिस परिणाम? तज्ञांकडून जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 13, 2024 09:36 PM IST

Health Care Tips: सध्या वृद्ध व्यक्तींना ऑस्टियोआर्थरायटिसचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. याचा वृद्धांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे ते जाणून घ्या.

वृद्धांना होणारी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या
वृद्धांना होणारी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या (unsplash)

Osteoarthritis In Elderly People: देशात वृद्धांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. सध्या देशात ६० वर्षांवरील वृद्धांची संख्या १४९ दशलक्ष आहे. ती वाढून १९५० सालापर्यंत ३४७ दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या, गजबजलेल्या आपल्या मुंबईसह संपूर्ण महाराष्‍ट्रात वृद्धांची संख्‍या वाढते आहे. राज्‍यात वृद्ध नागरिकांची काळजी घेण्‍यासंदर्भातील आव्‍हानांमध्‍ये सुद्धा वाढ होत आहे. या ट्रेण्‍डदरम्‍यान वृद्ध नागरिकांची सर्वात मोठी समस्‍या म्‍हणजे ऑस्टियोआर्थरायटिस (OA) चे वाढते प्रमाण. हा डि‍जनरेटिव्‍ह जॉइण्‍ट डिसीज आहे. या आजाराचे दैनंदिन जीवन तसेच आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

ऑस्टियोआर्थरायटिसचा वृद्धांवर होणारा परिणाम

आजी-आजोबांना त्‍यांच्‍या नातवांसोबत खेळताना त्रास होतो. त्यांना हालचाल करण्‍यास त्रास होण्‍यासह दररोजची कामे करणे आव्‍हानात्‍मक ठरते, ज्‍यामुळे मुलांना त्‍यांची काळजी घेणारे केअरगिव्‍हर्स बनावे लागते, असे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेत. ऑस्टियोआर्थरायटिसने पीडित अनेक वृद्धांसाठी ही प्रतिकूल वास्‍तविकता आहे. या आजाराचा त्‍यांचा स्‍वावलंबीपणा आणि जीवनाच्‍या दर्जावर मोठा परिणाम होऊ शकतो.

डोंबिवली येथील गोखले ऑर्थोपेडिक सेंटरचे मुख्य रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. जयंत गोखले यांनी ऑस्टियोआर्थरायटिसचे दोन आव्‍हाने सांगितली आहेत. एक म्हणजे वाढते वय आणि दुसरे म्हणजे ऑस्टियोआर्थरायटिसची लवकर सुरूवात होणे. ‘अनेकांना तरुण वयात ऑस्टियोआर्थरायटिसचा त्रास होत असल्याचा दिसून आले आहे. या आजारामुळे दीर्घकाळापर्यंत वेदना व मर्यादांसह जीवन जगावे लागते.’ असे असं डॉ. गोखले सांगतात.

ऑस्टियोआर्थरायटिसवर प्रतिबंधात्मक उपाय

या आजारावर प्रतिबंधात्‍मक उपाय असतात. यात वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्‍यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे या गोष्टींचा समावेश होतो. यामुळे ऑस्टियोआर्थरायटिस होण्‍याचा धोका कमी होतो. शिवाय या आजाराचे वेळेवर निदान झाल्यानंतर त्याचे व्‍यवस्‍थापन करण्याची गरज असते. लवकर हस्‍तक्षेपामुळे वेदनांवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते, हालचाल सुधारू शकते आणि सांध्‍यांना अधिक दुखापत होण्‍याला प्रतिबंध होऊ शकतो.

ऑस्टियोआर्थरायटिसवर उपचार

ऑस्टियोआर्थरायटिसवर औषधोपचार हा एक प्राथमिक उपाय आहे. परंतु यामुळे पुरेसा आराम न मिळाल्यास आणि त्रास वाढल्यास जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सारख्‍या प्रगत उपचार पर्यायांचा विचार करण्‍याचा सल्‍ला डॉक्टर देतात. रोबोटिक्सच्या मदतीने जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट करता येऊ शकते. रोबोटिक-असिस्‍टेड टोटल जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सर्जरी उत्तम अचूकता आणि उतींच्‍या कमी नुकसानासाठी ओळखली जाते. परिणामत: रिकव्‍हरी व सुधारित निष्‍पत्ती जलदपणे होतात. नी (गुडघा) व हिप रिप्‍लेसमेंट सारख्‍या जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सर्जरी वेदना कमी करून रूग्‍णांच्‍या हालचालींमध्‍ये सुधारणा करू शकतात, ज्‍यामुळे वृद्धांना स्‍वावलंबीपणे सर्वोत्तम जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग