Natural Home Remedies for Knee Pain: हिवाळा सुरू झाला की अनेक लोक गुडघेदुखीसोबतच स्नायू आणि सांधेदुखीची तक्रार करतात. संधिवातचा त्रास असलेल्या लोकांसाठी थंड हवामान खूप कठीण असतो. याशिवाय कधी-कधी जुन्या दुखापतीच्या वेदनाही हिवाळ्यात डोके वर काढू लागतात. वाढत्या थंडीमुळे तुमचे सांधेदुखी, गुडघेदुखी वाढण्याआधी योग आणि जीवनशैली तज्ज्ञांकडून जाणून घेऊया काही गोष्टी. तुमच्या डेली रुटीनमध्ये यांचा समावेश करून तुम्ही सांधेदुखी, गुडघेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.
रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतोच शिवाय आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. मेथीचे पाणी वजन कमी करण्यास, केसांची वाढ, चांगले पचन, महिलांचे आरोग्य तसेच खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते.
गुडघेदुखी कमी करण्यासाठी उन्हात बसून गरम तेलाने मसाज करा. मसाजसाठी तिळाच्या तेलात कापूर किंवा कॅस्टर ऑइल यासोबत लसणाचे तेल मिक्स करून मालिश करू शकता.
हिवाळ्यात मेथीचे लाडू हा तुमच्या नियमित आहाराचा भाग बनवा. साधारणपणे लोक मेथीचे लाडू कडू लागेल असा विचार करून खाणे टाळतात. पण मेथीचे लाडू खायला कडू नसतात. सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही रोज एक मेथीचा लाडू खावा.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे ३ व्यायाम दिवसातून दोनदा करा. दररोज पहिल्या व्यायामाचे ३० सेट करा. पहिल्या व्यायामामध्ये जमिनीवर बसा आणि पायाची बोटे पुढे-मागे हलवा. तर दुसऱ्या व्यायामामध्ये भिंतीचा आधार घेऊन उभे राहा आणि पायाची बोटे वरच्या बाजूला करा आणि खाली ठेवा. हे १५-२० वेळा करा. तिसऱ्या व्यायामामध्ये जमिनीवर बसून दोन्ही हातांच्या मध्ये ठेवून पाय वर करा. हे करत असताना हाताची बोटे पुढे आणि मागे हलवा. हा व्यायाम दोन्ही पायांनी २५ वेळा करा.
गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुमच्या आहारात नाचणीचा समावेश करा. यासाठी नाचणीची पोळी, नाचणी इडली, नाचणीचे लाडू, नाचणी सूप, नाचणी डोसा यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या