Natural Bleach: वाढते प्रदूषण, घाण, सूर्याची हानिकारक किरणे आणि आहार यामुळे चेहऱ्याचा रंग खराब होतो. मग हे ठीक करण्यासाठी उपाय केले जाते. आजकाल प्रत्येकालाच चेहऱ्यावर चमक हवी असते. यासाठी हमखास पार्लरची वाट धरली जाते. चेहरा उजळण्यासाठी ब्लीचचा वापर करतात. यामुळे त्वचा लवकर लाईट होऊ शकते, परंतु जास्त काळ ब्लीचिंग केल्याने त्वचेचे नुकसान होऊ लागते. ब्लीचमध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात, ज्याचा त्वचेवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात ब्लीच वापरल्याने त्वचेचे नुकसान होते. पण याला एक उपाय आहे तो म्हणजे घरगुती उपाय करणे. तुम्ही घरीच ब्लीच बनवून वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि कोणतेही नुकसान होणार नाही. जाणून घ्या कोणत्या गोष्टींनी तुम्ही घरीच कसं ब्लीच करू शकता.
चेहरा उजळण्यासाठी लिंबू आणि मधाचा वापर करू शकता. या नॅचरल पदार्थनामुळे तुमची त्वचा चमकदार होईल. या दोन्ही गोष्टी त्वचा स्वच्छ करतात.
एका भांड्यात १ लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाका. आता दोन्ही चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटे ठेवा आणि थोडासा कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही हे आठवड्यातून २-३ वेळा वापरू शकता, यामुळे तुमचा रंग सुधारेल.
मसूरमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. नैसर्गिक ब्लीच म्हणूनही तुम्ही मसूर वापरू शकता.
१ वाटी मसूर डाळ भिजवून नंतर चांगली बारीक करा. आता या मिश्रणात ३ चमचे दूध घालून मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. यानंतर नीट धुवा.
बेसन आणि दही दोन्ही चेहऱ्यासाठी चांगले मानले जाते. बेसन आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास ते नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते. यामुळे रंग साफ होतो आणि त्वचा सुधारते.
एका भांड्यात १ चमचा बेसन घेऊन त्यात दोन चमचे दही मिसळा. आता दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्याला लावा. साधारण १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)