Health Benefits of Black Raisin: अनेक स्वीट डिशमध्ये मनुका वापरल्या जातात. बहुतेक घरांमध्ये फक्त हिरव्या मनुका वापरल्या जातात. पण तुम्ही कधी काळ्या मनुका खाल्ल्या आहेत का? आयुर्वेदात काळ्या मनुका हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. काळ्या मनुकामध्ये व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियमसह व्हिटॅमिन सी असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच आरोग्याला अनेक फायदे देतात. जाणून घ्या कोणते फायदे मिळतात.
काळ्या मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी आणि आतून चमकदार ठेवण्यास मदत करतात.
गरोदरपणात अनेक वेळा महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा स्थितीत आराम मिळण्यासाठी काळ्या मनुका १ कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी हे पाणी प्यावे आणि नंतर मनुके चावून खावेत. असे केल्याने गर्भधारणे दरम्यान बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.
कॅल्शियमने समृद्ध असलेल्या काळ्या मनुक्याचे पाणी हाडे मजबूत राहण्यास मदत करते. काळ्या मनुकामध्ये असलेले खनिजे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
काळ्या मनुका खाल्ल्याने ब्लडप्रेशर संतुलित ठेवता येते. एनसीबीआयच्या (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या संशोधनातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. संशोधनानुसार काळ्या मनुकामध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. हे दोन्ही पोषक उच्च रक्तदाब कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच मनुकामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल रक्तदाब कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही संशोधनात नमूद केले आहे.
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा हार्मोनल असंतुलनाची समस्या भेडसावते. रजोनिवृत्तीच्या काळातही असंच काहीसं होऊ शकतं. अशा परिस्थितीत रोज काळ्या मनुकाचे पाणी प्यायल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवता येतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)