मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नाकावरच्या ब्लॅकहेड्सला औषध काय?; घरच्या घरी करा 'हे' उपाय

नाकावरच्या ब्लॅकहेड्सला औषध काय?; घरच्या घरी करा 'हे' उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 21, 2022 12:52 PM IST

ब्लॅकहेड्स मुळे तुमच्या सौंदर्याला जणू ग्रहण लागल्यासारखे वाटते. नाक आणि हनुवटीवर हे जास्त प्रमाणात दिसतात. यापासून सुटका मिळवायची असेल तर होममेड फेस मास्क एक चांगला पर्याय आहे. या होम रेमेडीज नक्की ट्राय करा.

ब्लॅकहेड्स
ब्लॅकहेड्स

How To Remove Blackheads: स्किनच्या पोर्स मध्ये तेल आणि घाण जमा झाल्यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या वाढू लागते. ही अशी समस्या आहे, ज्यामुळे स्किनवर काळे छोटे छोटे डाग दिसू लागतात. आणि यामुळे तुमचे सौंदर्य फिके होते. ऑइली स्किन असणाऱ्या लोकांना पिंपल्य आणि ब्लॅकहेड्सची समस्या कॉमन आहे. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक लोक विविध महागडे फेशियल करतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरच्या घरी नॅचरल गोष्टींचा वापर करून यापासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही असे काही फेस पॅक सांगत आहे, ज्यामुळे तुम्हाला ब्लॅकहेड्स पासून सुटका मिळवण्यात मदत करतील.

ब्लॅकहेड्समुळे पोर्सेस बंद होतात. त्यामुळे फेस पॅक लावण्यापूर्वी तुम्ही जर स्टीम घेतली तर पोर्स नरम आणि लूज होतात. ज्यामुळे फेस पॅकचा रिझल्ट देखील चांगला मिळतो आणि ब्लॅकहेड्स दूर होतात.

ब्लॅकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी होममेड फेस मास्क (Homemade Face Mask For blackheads)

ओट्स फेस मास्कः डेड स्किन काढण्यासाठी ओट्स बराच फायदेशीर असते. हे बॅक्टेरिया आणि एक्स्ट्रा ऑइल देखील काढते. सर्व स्किन टाईपच्या लोकांसाठी ओट्स चांगला असतो. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही ओट्सचा फेस मास्क बनवू शकता. यासाठी दोन चमचे ओट्स तीन टीस्पून दह्यासोबत मिक्स करा. नंतर हे पॅक ब्लॅकहेड्स असणाऱ्या जागी लावा. तुम्ही हे पूर्ण चेहऱ्याला सुद्धा लावू शकता. काही वेळानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

टोमॅटो फेस मास्कः टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोमधील अॅसिड एक्स्ट्रा तेल काढण्यासोबत स्किनला पोषण देते. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा सर्वात सोपा पॅक आहे. हे बनवण्यासाठी एक टोमॅटो घ्या आणि ते मॅश करून घ्या. हा गर चेहऱ्यावर किंवा ब्लॅकहेड्सवर लावा. दोन मिनीट हलक्या हाताने मसाज करा. काही वेळ तसंच ठेवून नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

अंड्याचा फेस पॅकः अंड्याचा पांढरा भाग पोर्स टाइट करण्यात मदत करते. यात प्रोटीन आणि मिनरल्स असतात. हे बनवण्यासाठी एक अंड्यातील फक्त पांढरा भाग घ्या ते चेहऱ्यावर लावा. याचा एक लेयर वाळल्यानंतर दुसरा लेयर आणि नंतर असे तीन वेळा करा. याला कमीत कमी १५ मिनीट राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

दालचिनी फेस पॅकः दालचिनी आणि मध यातील अँटी बॅक्टेरियल गुण स्किनवरील पोर्स बंद होण्यापासून बचाव करतात. दालचिनी स्किनवर ड्राय होते, त्यामुळे यात थोडे मध मिक्स करा. चांगले ब्लेंड करा आणि ही पेस्टची एक पातळ लेयर ब्लॅकहेड्सवर लावा. याच्यावर कापसाची एक पट्टी ठेवा आणि हळू दाबा. १० ते १५ मिनीट असेच राहू द्या आणि नंतर कॉटन स्ट्रिप काढून घ्या. कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel