Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

May 04, 2024 12:50 PM IST

Heat Rash In Babies: त्वचेशी संबंधित समस्या लहान मुलांना त्रास देऊ लागल्या, की पालकांची चिंता थोडी अधिकच वाढते. उन्हाळ्यात घामोळ्या का येतात आणि त्या टाळण्यासाठी काय उपाय आहेत, ते जाणून घेऊया.

वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय
वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Home Remedies To Treat Heat Rash In Babies: उन्हाळा सुरू होताच, आरोग्य आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या देखील दार ठोठावू लागतात. या ऋतूत केवळ प्रौढांनाच नाही, तर लहान मुलांनाही उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होतो. हीट रॅशला घामोळ्या देखील म्हणतात. त्वचेचे तापमान वाढल्याने उष्माघाताची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीराला खाज सुटणे आणि घामोळ्यांची समस्या जाणवू लागते. त्वचेशी संबंधित या समस्या नवजात बाळांना किंवा लहान मुलांना त्रास देऊ लागल्या, तर पालकांची चिंता थोडी अधिकच वाढते. उन्हाळ्यात घामोळ्या का येतात आणि त्या टाळण्यासाठी काय उपाय आहेत, ते जाणून घेऊया.

अहमदाबादस्थित बालरोगतज्ञ डॉ. रीमा पंड्या यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात तुमच्या बाळाला उष्णतेमुळे येणाऱ्या या घामोळ्यांपासून कसे वाचवू शकता, हे स्पष्ट केले आहे. या व्हिडीओमध्ये रीमा पांड्या यांनी उष्माघात आणि घामोळ्या टाळण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत. डॉक्टर रीमा म्हणतात की, उन्हाळ्याच्या काळात बाळाच्या त्वचेवर जास्त मॉइश्चरायझर किंवा टॅल्कम पावडर लावू नका. असे केल्याने घर्म ग्रंथी बंद होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेवर घामोळ्या किंवा पुरळ येऊ शकते.

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

नवजात बाळामध्ये उष्माघाताची लक्षणे

- शरीरावर पुरळ किंवा घामोळ्या उठणे.

- त्वचेला स्पर्श केल्यावर गरम वाटणे.

- त्वचेचा लालसरपणा.

- त्वचेवर खाज सुटणे.

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

नवजात बाळामध्ये उष्मा पुरळ किंवा घामोळ्या येण्याची कारणे

- नवजात बाळाच्या त्वचेवर घामोळ्या वातावरणातील अति उष्णतेमुळे किंवा आर्द्रतेमुळे उद्भवू शकतात.

- बाळाच्या त्वचेवर जास्त प्रमाणात क्रीम किंवा तेल लावल्याने घाम उत्सर्जित करणाऱ्या ग्रंथी ब्लॉक होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे घामोळ्या येतात.

- जेव्हा मुलांना असे कपडे घातले जातात, ज्यामुळे घाम निघू शकत नाही. तर, यामुळेही घामोळ्या येऊ शकतात.

- आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे परिधान केल्याने बाळाला घामोळ्या येण्याचा धोका देखील वाढतो.

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

बाळामध्ये घामोळ्या येऊ नयेत यासाठी टिप्स

- बाळ ज्या खोलीत झोपले आहे, त्या खोलीचे वातावरण सामान्य असेल याची विशेष काळजी घ्या.

- बाळाला आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे घालू नका.

-उन्हाळ्यात बाळाला काही काळ कपड्यांशिवाय ठेवा.

-स्पर्श केल्यावर त्वचेला उष्ण वाटत असल्यास, ती थंड करण्यासाठी तुम्ही थंड पाण्याने शरीर पुसून काढू शकता.

-डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रॅशेस क्रीम देखील वापरू शकता.

- बाळाला घट्ट कपडे घालणे टाळा.

Whats_app_banner