Home remedies for wrinkles: वास्तविक, वयानुसार मानवी शरीरात अनेक बदल घडतात. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अनेक वेळा आपण त्वचेची योग्य काळजी घेत नाही किंवा खाण्यापिण्याच्या निष्काळजीपणामुळे वेळेआधीच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैलीसह त्वचेची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते.
बहुतांश लोकांना माहिती नसेल की, त्वचा रात्री लवकर स्वतःला हील करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही योग्य गोष्टींच्या मदतीने रात्रीच्यावेळी त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तर, तुम्हाला खूप फायदा होईल. आज आम्ही तुम्हाला DIY नाईट क्रीम घरी कशी बनवायची? आणि ती कशी वापरायची याबाबत सांगणार आहोत. ही क्रीम त्वचेला हायड्रेट ठेवण्यासोबतच, सुरकुत्या आणि काळवंडलेल्या त्वचेपासून बचाव करण्याचे काम करते.
शिया बटर - २ चमचे
नारळ तेल - १ टीस्पून
बदाम तेल - १ टीस्पून
व्हिटॅमिन ई तेल - १ टीस्पून
लॅव्हेंडर किंवा गुलाब तेल - ५ ते ६ थेंब
बॉयलरच्या मदतीने शिया बटर आणि खोबरेल तेल नीट वितळून घ्या. ते पूर्णपणे वितळल्यावर थंड करायला ठेवा. थोडेसे थंड झाल्यानंतर त्यात बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई तेल घाला. आता हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता त्यात लॅव्हेंडर किंवा गुलाब जलचे ५ ते ६ थेंब टाका. आता चमच्याच्या साहाय्याने ते मऊसर होऊन पांढरे दिसू लागेपर्यंत फेटा. नंतर हे तयार मिश्रण एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. ही तयार झालेली क्रीम थंड आणि हवाबंद ठिकाणी ठेवा.
तसेच मुलतानी माती आणि गुलाबजल यांचादेखील सुरकुत्या कमी करण्यासाठी वापर करता येतो. यासाठी एका भांड्यात चार चमचे मुलतानी माती घ्या. त्यात थोडे गुलाबपाणी घाला आणि ते मिश्रण एकजीव करून त्याची मऊ पेस्ट बनवा.आता ही पेस्ट दररोज तुमच्या चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून वापरा. आणि सुकेपर्यंत राहू द्या. वाळल्यानंतर, चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. काहीच दिवसांत तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात चांगला फरक दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)