Home Remedies: पीरियड रॅशेसपासून सुटका देतील हे सोपे उपाय, अवघड काळ होईल सुकर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: पीरियड रॅशेसपासून सुटका देतील हे सोपे उपाय, अवघड काळ होईल सुकर

Home Remedies: पीरियड रॅशेसपासून सुटका देतील हे सोपे उपाय, अवघड काळ होईल सुकर

Dec 02, 2022 06:43 PM IST

Period Rashes: पीरियड्स रॅशची समस्या मुख्यतः सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर, जास्त ओलावा आणि नॅपकिन त्वचेवर घासल्यामुळे उद्भवते. जर तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान पुरळ येण्याची समस्या असेल तर हे उपाय करुन पहा.

पीरियड रॅशेसपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
पीरियड रॅशेसपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Tips to Cure Period Rashes at Home: मासिक पाळी दरम्यान, बहुतेक महिलांना वेदना, सूज येणे आणि मूड स्विंग्स यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीसोबतच स्त्रीला रॅशेसचा त्रास होऊ लागतो तेव्हा ही समस्या अधिकच वाढते. त्यामुळे त्यांना चालायला आणि बसायलाही त्रास होऊ लागतो. पीरियड्स रॅशची समस्या मुख्यतः सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर, जास्त ओलावा आणि नॅपकिन त्वचेवर घासल्यामुळे उद्भवते. जर तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान रॅशेस येण्याची समस्या असेल तर या सोप्या उपायांचा अवलंब करा.

पीरियड्स रॅशेसपासून दूर राहण्याचे उपाय

पॅड बदलत रहा

एकच पॅड जास्त वेळ ठेवू नका. असे केल्याने केवळ पुरळ उठत नाही तर तुमच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत रॅशेस येऊ नये म्हणून पॅड वारंवार बदलण्याची सवय लावा.

नियमित स्वच्छता करा

मासिक पाळीत पुरळ येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पर्सनल पार्टची योग्य प्रकारे स्वच्छता न करणे. यावेळी महिलांनी आंघोळ करताना किंवा प्रत्येक वेळी यूरिन करताना आपले इंटिमेट पार्ट पाण्याने धुवावेत. जेणेकरून कोणतेही बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत.

स्वस्त नॅपकिन्स वापरू नका

अनेक वेळा महिला पैसे वाचवण्यासाठी स्वस्त सॅनिटरी पॅड वापरतात. स्वस्त आणि खराब ब्रँडचे पॅड वापरल्याने त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका वाढतो. सॅनिटरी नॅपकिन्स घेताना गुणवत्तेकडे लक्ष द्या.

योग्य अंडरवेअर घाला

मासिक पाळी दरम्यान योग्य अंडरवेअर वापरावीत. उन्हाळ्यात कॉटन अंडरवेअर वापरा. त्यामुळे जास्त घाम येत नाही. सिंथेटिक आणि घट्ट अंडरवेअर घालणे टाळा.

आइस कॉम्प्रेस

बर्‍याच वेळा पीरियड्स रॅशमध्ये जळजळ होण्याची आणि वेदना होण्याची समस्या असते, अशावेळी आइस कॉम्प्रेसने आराम मिळू शकतो. बर्फ वापरण्यासाठी काही बर्फाचे तुकडे एका स्वच्छ कपड्यात ठेवा आणि रॅशच्या सभोवतालची जागा दाबा. कॉम्प्रेस लावल्याने सूज, वेदना आणि जळजळ यापासून त्वरित आराम मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner