Methods to Get Rid of Bad Breath from Mouth: तोंडाला दुर्गंधी आल्यावर कोणाशीही बोलताना लाज वाटते. अनेकदा ब्रश केल्यानंतरही लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. कधी कधी असे होण्यासाठी काही सामान्य कारणेअसू शकतात. जसे की पोट स्वच्छ नसणे, नीट ब्रश न करणे इ. जर तोंडाची दुर्गंधी सामान्य कारणांमुळे होत असेल तर त्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. येथे पाहा या पद्धती
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
१) लवंग
अनेक वेळा ब्रश करूनही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा लवंग खाऊ शकता. हे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की जास्त लवंग खाऊ नये.
२) बडीशेप
जेवणानंतर बडीशेप खा. बडीशेपमध्ये कूलिंग एजंट असते जे पोट थंड ठेवते. त्यामुळे तोंडाचा वास निघून जातो. यासोबतच बडीशेप अन्न पचण्यास देखील मदत करेल.
३) तुळशी
औषधी गुणांनी परिपूर्ण तुळशीमुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर करतात. त्याचे एक पान पाण्यासोबत गिळावे.
४) मोहरीचे तेल
ही जुनी रेमेडी आहे. यासाठी मोहरीच्या तेलात थोडे मीठ घालून बोटाच्या साहाय्याने हिरड्यांना मसाज करा. यामुळे हिरड्या नेहमी निरोगी राहतील आणि तोंडाला दुर्गंधी येणार नाही.
५) मीठाचे पाणी
श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याने गार्गल करू शकता. यासाठी पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. नंतर या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. हे ५ ते ६ वेळा करा आणि दिवसातून दोनदा करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या